नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा…आ. निलंगेकर
ढगफुटी,अतिवृष्टी,कोरोनावर मात करूया असे गणरायाला साकडे घालूया…
निलंगा,-( प्रशांत साळुंके ) लातूर जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून सतत पावसामुळे गावातील घरांचे व शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी रितसर माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे सदर निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.
सदर,माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले की,मागील तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सतत पर्जन्यमान कोसळत असल्याने दि.7 रोजी या सततच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी शेती पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे.त्याचबरोबर या पावसाने नदीकाठच्या गावांमध्ये नदीला पूर आल्याकारणाने गावातील गोर-गरीबांच्या घरांमध्ये व गोठयात पाणी शिरल्याने घराची पडझड तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने पिक व नदीकाठच्या गाव नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकर्यांसह नागरिकांना दिलासा देण्यात यावी,अशी मागणी माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी केली आहे.

माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यातील नागरिकांना बोलत असताना त्यांनी सततच्या होणार्या पावसामुळे कामाव्यतिरिक्त बाहेर कोणीही जाऊ नये असे म्हटले आहे.त्याचसोबत,ढगफुटी,अतिवृृष्टी,कोरोनावर मात करूया असे साकडे गणरायाला घालून हे संकट टाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या गावाची काळजी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.सर्वसामान्य जनता ही अडी-अडचणीत आहे का हेही पाहणे गरजेचे त्यामुळे माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर म्हणून जे कोणी अडचणीत आहेत त्यांनी माझ्यानंबर माहिती किंवा प्रशासनाला कळवणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.

मागील वर्षांपासून कोरोना संकटात आहोत सर्वांनी आपआपल्या कुटुबांची काळजी घेणे गरजेचे आहे.सोबत,तिसर्या लाटेचीही शक्यता असल्याने आपण अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वांनी आपण आपल्या घरीच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करुन कोरोनाच्या तिसर्या लाटेची संभाव्य शक्यता निर्माण न होण्यासाठी हे संकट दूर कर असे साकडे घालून हा सण साजरा करण्यात यावा,अशी संकल्पना माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

एकंदर,गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस हा सर्वसामान्यांच्या नुकसानीचा ठरत असल्याने माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तात्काळ लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी.पी.पृृृथ्वीराज यांना रितसर निवेदनात गावातील घरांचे व शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्यात यावी ही मागणी नमुद केली आहे.












