सह्याद्री देवराई लातूर यंदा गोमय गणेशाची प्रतिष्ठापना
लातूर …पर्यावरण रक्षणाचा वसा घेतलेल्या सह्याद्री देवराई लातूर यांच्या पुढाकाराने आणि वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून सह्याद्री देवराई रामवाडी झरी जि लातूर येथे यंदा पर्यावरण पूरक गोमय गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सह्याद्री देवराई च्या या प्रकल्पाबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा येथे कालच पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती. नागरिकांनीही पर्यावरणपूरक गोमय गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

ही गणेशमूर्ती गोमातेचे शेण, डिंक व रंगासाठी वापरली जाणारी काव अशा फक्त आणि फक्त पर्यावरणातील साहित्य वापरून करण्यात आलेली आहे. या गणेशाची प्रतिष्ठापना करताना आज रामवाडी झरी येथे एका झाडाच्या रोपाची ही पूजा करण्यात आली. आणि उपस्थितांना प्रसाद म्हणून गावरान आंब्याचे ,जांभळाचे रोपे देण्यात आली . दररोज मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पूजा करण्यात येणार आहे तसेच श्री गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी गणेश कुंड तयार करून त्यामध्ये ते विसर्जन करून ते पाणी मूर्ती शेजारी पूजलेल्या झाडाचे रोपण करून त्या झाडाला घालण्यात येणार आहे असे सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप म्हणाले.

प्रत्येक वर्षी या प्रकारे वृक्ष लावले जाणार आहेत. जेणेकरून भविष्यात एक गणेश बाग ही वृक्ष बाग येथे तयार होईल. या मूर्तीसाठी वापरण्यात आलेले साहित्य पर्यावरणातील असल्याने हा संपूर्ण पर्यावरणपूरक गणेश आहे पर्यावरणाची जपणूक व्हावी तसेच पर्यावरणाचे जतन व्हावे व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून आज प्रतिष्ठापना करताना सह्याद्री देवराई चे समन्वयक सुपर्ण जगताप ,वन विभागाच्या वन रक्षक मीरा बोंबले,तसेच सह्याद्री देवराईचे डॉ बी आर पाटील , डॉ दशरथ भिसे, अमोल सूर्यवंशी, बळीभाऊ नागरगोजे व सह्याद्री देवराई चे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.












