ऑक्सिजन निर्माते अभियंता राहुल इघे यांना “अभियंता जानाईश्री “ पुरस्कार जाहीर
श्री.जानाई प्रतिष्ठानचा अभियंता दिन उपक्रम
लातूर…. अभियांत्रीकी क्षेत्रात विशेष कामगिरी केल्या बद्दल अभियंत्याला दिला जाणारा “अभियंता जानाईश्री “ पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. दरवर्षी श्री जानाई अभियांत्रीकी प्रतिष्ठानच्या वतीने अभियंता दिना दिवशी हा पुरस्कार जाहीर करून निवड झालेल्या अभियंत्याला सन्मानित केले जाते.
> वातारणातील हवे पासून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प विकसित करून भारतामध्ये १५० पेक्षा जास्त ठिकाणी असे प्रकल्प कार्यान्वित करणारे तसेच जगातील ६५ देशात आर अँड डी हेड म्हणून कार्य करणारे नाशिक येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे तरूण यंत्र अभियंता राहुल इघे यांना यावर्षीचा अभियंता जानाईश्री “जाहीर करण्यात आला आहे.
> महावस्त्र , सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र व रू १५,०००/- असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवार दिनांक २६ सप्टेबर २०२१ रोजी राहुल इगे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.याच पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री जानाई विद्यार्थी मंडळाच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू हुशार,होतकरू आकरा विद्यार्थ्यांना प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या प्रवेश शुल्काचे धनादेश वितरण करण्यात येणार आहेत.
> पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जानाई सांस्कृतिक मंडळाचे पालक अतुल ठोंबरे, अध्यक्ष डाॅ.वैशाली टेकाळे, कार्याध्यक्ष अभि.श्रीकांत हिरेमठ, सचिव दत्तात्र्येय मुंढे, डॅा.अभिजीत मुगळीकर, राजेश मित्तल डाॅ.आरती संदीकर, प्रसाद उदगीरकर, डाॅ ऋजुता अयाचित, डाॅ.पंकज तेरकर, अर्कि.विजय सहदेव, शिवाजी कांबळे, भूषण दाते, महेश औरादे, संजय प्र अयाचीत, विजय चोळखने, डाॅ.पी.के शहा, विद्यार्थी मंडळाचे समर्थ कुलकर्णी, प्रदुम्न कुलकर्णी, अवधुत जोशी, कांचन इस्लामपूरे, भिकाजी पाटील, अमृता कदम, अक्षय कुलकर्णी, चैतन्य सारंग, मल्लिकार्जुन जावळे, ज्ञानोबा कुलकर्णी यांनी केले आहे..











