0
219

मांजरा तेरणा नदी काठच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव यात्रा काढणार-माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

डोंगरगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली..

जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड यांची उपस्थिती..

निलंगा,-(प्रतिनिधी )-अतिवृृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मानवनिर्मित पूर परिस्थितीमुळे, आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली,त्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानीच्या प्रमाणात अतिशय तुटपूंजी मदत मिळाली .
मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीसह शेतातील माती वाहून गेले जमीन खरडून गेली अशा शेतकऱ्यांना अद्यापि मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या व्यंग बनत चालला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देऊन पुन्हा उभा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तेरणा मांजरा नदीकाठच्या ज्या शेतकऱ्यांची माती वाहून गेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये मदत करावी अशी मागणी अनेक दिवसापासून आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. या मागणीकडे निष्क्रिय शासनाने लक्ष दिले नाही व अद्याप पर्यंत कसलीच मदत न केल्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील तरुण शेतकरीआर्थिक विवंचनेला कंटाळून नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव यात्रा काढणार असल्याचे यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील तरुण पंचवीस वर्षाचा शेतकरी आकाश बन तेरणा नदीवरील गॅरेज मध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील अकार्यक्षम पालकमंत्री यांच्या निष्क्रिय पणामुळे प्रशासनाने नदीकाठच्या शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता मांजरा धरणावरील 18 दरवाजे एकदाच उघडले असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्याची संपूर्ण जमीन उखडून गेली ,पिके वाहून गेली त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज ,कौटुंबावर निर्माण झालेलेआर्थिक संकट व शासन कसल्याच पद्धतीची आर्थिकमदत करत नसल्यामुळे निराश होऊन आकाश बन यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड साहेब यांनी घेतलीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचे सांत्वन करून आपण आवश्यक ती मदत देऊ, शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्याला न्याय मिळवून देऊ, आपण खचून जाऊ नका मी व भारतीय जनता पार्टी संपूर्ण आपल्या पाठीशी सदैव खंबीर उभी आहोत असे सांगितले.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारला मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे दुःख समजलेच नाही. सरकार मराठवाड्यातील जनता विरोधी सरकार आहे ,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे. 50000 नुकसान भरपाई दिली पाहिजे असे म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या आघाडी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास मंत्र्यांना मराठवाड्यामध्ये फिरण्याचा नैतिक अधिकारचं नाही. महाराष्ट्र शासनाने तेरणा व मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्वरित भरीव आर्थिक मदत(विशेष आर्थिक पॅकेज) द्यावी अन्यथा मंत्र्यांना लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही. असा इशारा देऊन माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मांजरा तेरणा शेतकरी बचाव यात्रा काढून आंदोलन तीव्र करण्यात येईल.


यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड ,संघटन सरचिटणीस संजय दोरवे, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, अँड.संभाजीराव पाटील , ज्ञानेश्वर चेवले ,माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश बद्दे ,नागनाथ चलमले विनायक पाटील ,प्रल्हाद मोहिते, गणेश धुमाळे ,गणेश सलगरे, रमेश मोहिते आदी भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here