*डॉ. जोगदंड यांना राज्यस्तरीय पुरस्कार*

0
234

डॉ.बबन जोगदंड यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

पुणे, दि. २५
यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथी यांच्यावतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्वर्गीय मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्रातील प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांची या पुरस्कारासाठी समितीने निवड केली आहे.

डॉ. जोगदंड यांनी यापूर्वी पत्रकारितेत बारा वर्षे विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. आता गेल्या अठरा वर्षांपासून यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्रात अधिकारी म्हणून ते काम करतात. त्यांनी पत्रकारितेत पीएचडी ही पदवी संपादन केली. इतरही जवळपास पंचवीस पंचवीस विषयात पदव्या, पदविका ,प्रमाणपत्र, अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. याबद्दल नुकतीच त्यांची’ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली आहे.


डॉ.जोगदंड यांचे पत्रकारिता, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असून त्यांना यापूर्वीही देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला होता. डॉ. जोगदंड हे उत्तम लेखक, वक्ते व प्रभावी सूत्रसंचालक सुद्धा आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here