ओबीसी जनमोर्चाच्या वतीने साखर पेढे वाटप
इचलकरंजी ; दि.२३ ( प्रतिनिधी) —इचलकरंजी येथे शिंदे – फडणवीस सरकारनेओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ओबीसी जनमोर्चाच्या वतीने येथील मलाबादे चौकात साखर पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय जाहीर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय व शिंदे – फडणवीस राज्य सरकारचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्यात इम्पिरिकल डाटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील घटकांना राजकीय आरक्षणपासून वंचित राहावे लागले होते. या दरम्यान ओबीसींशिवाय काही निवडणूक पार पडल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी ओबीसी जनमोर्चातर्फे राज्यातील सर्व भागात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बांठिया आयोगाने सादर केलेला इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. मागील अडीच वर्षांपासून ओबीसी समाज, राज्य सरकार यांच्याकडून केलेल्या पाठपुरावा आणि लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयाप्रित्यर्थ इचलकरंजी येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मलाबादे चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ओबीसी जनमोर्चाचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , धोंडिराम जावळे ,बजरंग लोणारी ,मलकारी लवटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारचे व यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना साखरपेढे भरवण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी सयाजी चव्हाण, विश्वनाथ मुसळे, नरेश नगरकर, सुनिल मेटे, नागेश क्यादगी, , गणेश माच्छरे, युवराज शिंगाडे, विवेक चोपडे, श्रीकांत कोरवी, उत्तम कुंभार, राजेंद्र रावळ, दीपक शिंगाडे, नामदेव कोरवी यांच्यासह अन्य उपस्थित होते.




