22.9 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeठळक बातम्या*संजय बनसोडे यांनी केले अन्नछत्र मंडळाचे कौतुक*

*संजय बनसोडे यांनी केले अन्नछत्र मंडळाचे कौतुक*

अक्कलकोट, दि. २९ : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भक्त सेवा स्वामींचा साक्षात्कार असून, न्यासाने केलेल्या प्रगतीमुळे श्री क्षेत्र अक्कलकोटचे नाव जगाच्या पाठीवर असल्याचे मनोगत माजी मंत्री ना. संजय बनसोडे (उदगीर) यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत रामेश्वर निटूरे,सिद्धेश्वर पाटील, रामराव बिरादार, कुणाल बागबंदे, ज्ञानेश्वर बिरादार, स्वीय सहाय्यक महेश स्वामी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, रविराज सिद्धे, रुद्रय्या स्वामी, महेश स्वामी, इरेश जटगे, स्वप्नील चितली, आकाश तुवर, शंकरराव पाटील, सिकंदर चाऊस, मोनेश्वर सुतार, श्रीकांत रंगदाळ, बसवराज पाटील, विनायक सेडम
व न्यासाचे एस.के. स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतिश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, दत्ता माने, बाळासाहेब घाडगे, पिंटू साठे, शिवू स्वामी, प्रसाद हुल्ले, नामा भोसले, राजू पवार यांच्यासह सेवेकरी, स्वामीभक्त, कर्मचारी आदीजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]