.
इचलकरंजी – येथील देहदान आणि नेत्रदान चळवळी तीलअग्रेसर कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अनिसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक चव्हाण यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
विनायक चव्हाण हे मुळचे इचलकरंजी शहरातील असून त्यांनी चळवळीच्या निमित्ताने महाराष्ट्र भर अनेकदा दौरा केला होता. त्यांना गाण्यांची आवड होती शाहीर म्हणूनही अनेकजण ओळखत होते. इचलकरंजी शहर अनिसचे ते संस्थापक सदस्य तसेच माजी शहjर अध्यक्ष ही होते. इचलकरंजीत देहदान आणि नेत्रदान चळवळ सुरु करण्यासाठी व प्रचार करण्या साठी कै. विनायक चव्हाण यांचे मोठे योगदान आहे.शासकीय आयजीएम रुग्णालया मध्ये उपचार घेताना आज मंगळवार दि.2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी मुले मुलगी नातवंडे असा परिवार आहे.




