25.2 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeशैक्षणिक*लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा*

*लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा*


माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांची अधिवेशनात मागणी
लातूर/प्रतिनिधी ः– शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नने संपूर्ण देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या लातूर पॅटर्नची यशस्वविता लक्षात घेऊन आणि पॅटर्नच्या यशाचा आलेख अधिक उंचावण्यासाठी लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
विधानभवनचे पावसाळी अधिवेशन सुरु असून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत चर्चा करीत असताना सदर मागणी केलेली आहे. मराठवाड्याचे ऑक्सफर्ड म्हणून ओळख असलेल्या लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणूनही संबोधले जाते. शिक्षणाच्या लातूर पॅटर्नने संपूर्ण देशात नावलौकिक मिळविलेला आहे. लातूरात शिक्षण घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लातूरमध्ये शिक्षण घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा यशाचा आलेख अधिकच उंचावलेला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात शिक्षणाच्या लातूर पॅटर्नचा दबदबा निर्माण झालेला आहे.
शिक्षणाच्या लातूर पॅटर्नचा नावलौकिक लक्षात घेऊन आणि या पॅटर्नचा आलेख अधिक उंचावण्यासाठी लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापन व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव राज्य शासनाने पाठवणे क्रमप्राप्त आहे. लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापन व्हावे याकरीता आवश्यक असणार्‍या सर्व बाबी उपलब्ध असून केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे, असे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या चर्चेवेळी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन लातूरात केंद्रीय विद्यापीठ स्थापन होण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक असणारा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठावा अशी मागणी यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी अधिवेशनात केली आहे. या मागणीबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखविलेली असून लवकरच याबाबत आवश्यक असणारी कार्यवाही सुरु होईल असा विश्वास माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]