27.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeकृषी*विलास सहकारी साखर कारखाना उभारणार बायोगॅस निर्मिती प्रकल्प*

*विलास सहकारी साखर कारखाना उभारणार बायोगॅस निर्मिती प्रकल्प*

 

विक्रमी ऊस गाळप करून जास्तीत जास्त 

भाव देण्याची परंपरा कायम राखणार

२० व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत 

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची घोषणा 

  • आदरणीय विलासराव देशमुख साहेब स्मारकाचे लवकरच लोकार्पण●
  • ●शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संकुल ●
  • ●कर्मचाऱ्यांनाही १२ टक्के वेतनवाढ●
  • ●कारखाना परिसरात बहुद्देशीय सभागृहाची उभारणी● 
  • ●अद्ययावत सुविधांनीयुक्त प्रशासकीय इमारत●
  • ●सभासदांचाच ऊस गाळप  करण्याचे धोरण●
  • ●सभासद नसलेल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी विचारांती वेगळे धोरण●  
  • ●पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वापरात आणण्यासाठी विशेष योजना ●
  • ●एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत शास्त्रोक्त योजना●

लातूर प्रतिनिधी : ६ सप्टेंबर २०२२ :

यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. ऊसाचे पिकही उत्तम आहे त्यामुळे याही वर्षी विलास सहकारी कारखाना विक्रमी गाळप करेल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देईल अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख या दिली..साखर, विज आणि इथेनॉल नंतर हा कारखाना आता बायोगॅसचीही निर्मीती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर तालुक्यातील निवळी येथे विलास सहकारी शेतकरी साखर कारखान्याची २० वार्षीक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. 

या सर्वसाधारण सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, वि.वि.देशमुख मां.शे.स.साखर कारखानाचे व्हा. चेअरमन, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, टवेन्टिवन शुगर्स लि. चे. व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास बॅकचे व्हा. चेअरमन चंद्रकांत देवकते, माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, उपसभापती मनोज पाटील, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कारखन्याचे संचालक गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सूडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, दगडूसाहेब ऊर्फ ज्ञानोबा पडीले, विलास साखर युनीट १ चे कार्यकारी संचालक संजीव देसाई, विलास साखर युनीट २ चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, टवेन्टिवन शुगरचे कार्यकारी संचालक एस.बी.सलगर कारखान्याचे सभासद, पदाधिकारी, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी  कारखाना सभासद शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, मागच्या वर्षात विलास कारखान्यासह मांजरा परीवारातील  सर्वच साखर कारखान्यांनी विक्रमी गाळप केले आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून जून मध्येही कारखाना चालवला. कारखान्याने सर्वाधीक साखर उतारा मिळवला. त्यामूळे विलास कारखाना युनीट १ ने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २७७५ तर युनीट २ ने २७८१ रूपये भाव दिला आहे. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढ दिली आहे. आगामी वर्षातही युनीट क्र १ ने ७ लाख ५० हजार तर युनीट २ ने ६ लाख टन ऊस गाळप करण्याचे उदिष्टय ठेवले आहे. हे करतांना सभासदांचा ऊस गाळपास प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आदरणीय विलासराव देशमुख साहेब 

यांच्या स्मारकाचे लवकरच लोकार्पण

येत्या गळीत हंगाम शुभारंभाच्यावेळी कारखान्यात उभारण्यात आलेल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल. आपण हा कारखाना उत्तमरीत्या चालवला आहे आता शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उत्तम शैक्षणिक संकुलही उभारू तसेच सभासदांच्या मुलांची लग्न व इतर समारंभासाठी कारखाना परिसरात बहुद्देशीय सभागृहाची उभारणी करू असे सांगून कारखान्याच्या कामकाजासाठी लवकरच अद्ययावत सुविधांनीयुक्त प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॉम्पे्रस्ड बायोगॅसची निर्मिती करणार

मांजरा परीवारातील साखर कारखान्यांनी आजवर साखर, वीज आणि इथेनॉलची निर्मीती केली आहे. विलास कारखान्यात कॉम्पे्रस्ड बायोगॅसचीही निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लवकरच भूमीपूजन करण्यात येईल अशी घोषणा आमदार अमित देशमुख यांनी केली. 

एकरी ऊसउत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रोक्त योजना

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वापरात आणण्यासाठी कारखान्यामार्फत विशेष योजना राबवण्याचा विचार असल्याचे सांगून एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.

बिगर सभासदाचा ऊस गाळप करण्यासाठी वेगळे धोरण

कोणत्याही कारखान्याचे सभासद नसलेल्या लातूर परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्याशी विचारवीनीमय करून वेगळे धोरण ठरवण्यातयेईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.  

प्रारंभी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गळीत हंगाम २०२१-२२  मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, व्हा.चेअरमन रविंद्र काळे, पुंडलीक सुभेदार, महिद्र मुळे, महादेव यादव यांच्यासह वाहतूक ठेकेदार, तोडणी ठेकेदार आदींचा सत्कार करण्यात आला. गत गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये उसाला उच्चांकी भाव दिला व सर्वाधिक ऊसाचे गाळप केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांचा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, सभासद चंद्रकांत टेकाळे, संतोष दगडे, सतिष शिंदे, सुनिल पाटील, शिवाजी पांढरे, तात्यासाहेब पालकर, बाबुलाल शेख, बप्पा माने, ओम कदम, शिवाजी बावणे, अभिलाष सोमासे, नवनाथ बोळे, गोपळ शिंदे, कमलाकर घुले, गणेश ओझा, ज्ञानेश्वर भिसे, गणेश ढगे, श्रीकृष्ण काळे, राजेद्र सराफ यांनी सत्कार करून आभार मानले. 

     या कार्यक्रमास चेअरमन अंगद ढगे पाटील, व्हा. चेअरमन रमेश देशमुख, मारूती पांडे, संभाजी रेडडी, शाहूराज पवार, नवनाथ काळे, सुपर्ण जगताप, श्याम भोसले, भैरवनाथ पिसाळ आदी उपस्थित होते. विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी अहवाल वाचन केले, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषय पत्रिके वरील विषयाचे वाचन केले. सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूरी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]