27.5 C
Pune
Saturday, December 20, 2025
Homeठळक बातम्या*इचलकरंजी शहर सूर्यवंशी क्षत्रिय हिंदू कलाल (खाटीक) समाजाच्या अध्यक्षपदी प्रवीण जानवेकर*

*इचलकरंजी शहर सूर्यवंशी क्षत्रिय हिंदू कलाल (खाटीक) समाजाच्या अध्यक्षपदी प्रवीण जानवेकर*

इचलकरंजी ;( प्रतिनिधी ) –

इचलकरंजी येथील सूर्यवंशी क्षत्रिय हिंदू कलाल (खाटीक) समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. यामध्ये अध्यक्षपदी प्रवीण जानवेकर यांची निवड करण्यात आली. तर उर्वरीत पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष श्रीकांत कलाल, सेक्रेटरी राजू मगदूम, खजिनदार शेखर बिळगीकर, कार्याध्यक्ष सचिन उर्फ बंडू बिळगीकर यांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष श्रीकांत कलाल यांनी नूतन अध्यक्ष प्रवीण जानवेकर यांना आपला पदभार सोपवला. यांनतर समाजाच्यावतीने जानवेकर यांच्यासह पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष प्रवीण जानवेकर म्हणाले, इचलकरंजी शहरात हिंदू कलाल (खाटीक) समाज अल्पसंखेत आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या समाजाला गृहीत धरले जात नाही. त्याचा परिणाम म्हणून समाजाचे खच्चीकरण होते. समाजाच्या उन्नतीसाठी आता समाजाने युवकांची कार्यकारिणी केली. हि जबाबदारी समजून येणाऱ्या काळात समाजासाठी सर्वस्व अर्पण करून काम करेन, अशी ग्वाही दिली. यावेळी समाजबांधवांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मलकू मगदूम, सुभाष बिळगीकर, नागाप्पा कलाल, दत्ता मगदूम, अमृत बिळगीकर, राहुल बिळगीकर, अरुण घोलपे, सतीश घोलपे, बाबू मगदूम, सतीश बिळगीकर, संतोष बिळगीकर, नितीन बिळगीकर, महादेव घोलपे, नागुबाई मगदूम, सुनीता बिळगीकर, लक्ष्मी गोगेकर, शशिकला जानवेकर, अनिता बिळगीकर, सुशील मगदूम, मालूबाई जानवेकर यांच्यासह समाजबांधव महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]