मुंबई , १३ ऑक्टोबर २०२२ : हंगामा प्ले हा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी मनोरंजन मंच (एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म) असून त्यांनी त्यांचा लोकप्रिय मूळ कार्यक्रम रात्री के यात्री चा दुसरा बहुप्रतिक्षित सीझन लॉन्च केला. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर रात्री के यात्री -२ मध्ये लाल बत्ती भागातील पाच अभिनव, विचार-प्रवर्तक कथांचा समावेश राहील. या कार्यक्रमात दूरदर्शन आणि सिने-क्षेत्रातील नामवंत कलाकार रश्मी देसाई, शरद मल्होत्रा, शक्ती अरोरा, मोनालीसा, शेफाली जरीवाला, अदा खान, भावीन भानुशाली, अबिगेल पांडे. प्रियल गोर, मोहित अबरोल, मीरा देवस्थळे आणि आकाश दाबाडे दिसणार आहेत. अनिल व्ही कुमार यांचे दिग्दर्शन, हंगामा ओरिजनल्सच्या साथीने अनिल व्ही कुमार प्रॉडक्शन निर्मितीसाह्य या कार्यक्रमाला लाभले आहे.

या वास्तवदर्शी नाट्यकृतीमध्ये पहिल्यांदाच रेड लाइट एरियाला भेट दिलेल्या व्यक्तिरेखेच्या भोवताली कथानक फिरेल आणि एक हटके अनुभवाची प्रचिती येईल. या सीझनमध्ये समाजातील सर्व थरांतील व्यक्तिरेखांची झलक दिसेल. त्यात एक आत्ममग्न स्वत:ला न साजेशा मतांना धुडकावून लावणारा राजकारणी आहे; एकमेकांशी विवाह करू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी टोकाचे पाऊल उचलणारे जोडपे, स्वत:च्या लग्नातून पळून आलेला नवरा; प्रतिस्पर्ध्याशी सामना करणारा एक रहस्यमय आगंतुक; वेश्यागृहात स्वत:चे भाग्य सापडलेला स्थानिक चोर सर्वांचे नशीब एका रात्रीत बदलते. काही जणांना वेश्यालयात सांत्वना आणि समाप्ती सापडते, तर इतरांना शहाणपण आणि स्वातंत्र्य मिळते आणि ते आयुष्यात कायम जाणवणाऱ्या गुणांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी दूरवर चालत जातात.
या कार्यक्रमाविषयी बोलताना, हंगामा डिजिटल मीडिया’चे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, रात्री के यात्री चा पहिला सीझन मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याने, आम्हाला अशाच आणखी प्रभावी कथा तयार करायला भाग पाडले. रात्री के यात्री 2 अभूतपूर्व सादरीकरणासह संपूर्ण नवीन प्रकारची कथा सादर करत आहे. या सशक्त कथा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतील, याबद्दल आम्हाला खात्री वाटते
या मालिकेविषयी आपला उत्साह शेअर करताना, अनिल व्ही कुमार प्रॉडक्शन’चे संस्थापक अनिल व्ही कुमार म्हणाले, प्रेक्षकांकडून मिळालेला हृदयस्पर्शी प्रतिसाद मला या शो बद्दल इतर गुंतागुंत शोधण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला. रेड-लाइट एरियामध्ये अस्तित्वात असलेल्या अनेक घटकांमधील विसंगती नाजूकपणे हायलाइट करणे आणि प्रत्येक पात्राद्वारे तुलनेने ते दर्शवणे हे प्रत्येक कथेचे माझे उद्दिष्ट होते. अभिनेते आणि क्रू ऑनबोर्ड अशी सहाय्यक टीम मिळाल्याने मला आनंद झाला आहे, त्यांनी दिलेले योगदान अपवादात्मक म्हटले पाहिजे. प्रेक्षक पूर्वीप्रमाणेच या कार्यक्रमावरही प्रेमाचा वर्षाव करतील, ही आशा मला वाटते.
रात्री के यात्री 2 चा ट्रेलर इथे बघा- https://www.youtube.com/watch?v=fDfKhZK_sKY&t=7s




