*भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने,तत्वनिष्ठ राजकीय पर्वाचा अस्त*
- लातूरकरांच्या शोकसभेत सहवेदना
लातूर-शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल पत्रकार भवन लातूर येथे सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेत विविध पक्ष व संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या,’सांगोला विधानसभा मतदारसंघातुन 11 वेळा निवडणूक जिंकुन जनतेची अखंड सेवा करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या जडण घडनीत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे .निर्मोही वर्तीने राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारे ते एक चालते बोलते विद्यापीठ होते. नव्या पीडिला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खुप काही होते याचा अनुभव मी स्वताः घेतला आहे त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला आहे असे असले तरी त्यांचे कार्य व विचार कायम प्रेरणा देत राहतील’ अश्या शोकसंदेशाचे वाचन प्रा.सुधीर अनवले यांनी केले यावेळी माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव, जेष्ठ विधिज्ञ भाई संतराम चेवले,ॲड अण्णाराव पाटिल यांनी समाजकारणासाठी विकासाची नाडी लक्ष्यात घेऊन आयुष्याभर संघर्ष करणाऱ्या आणि पक्ष व तत्व यांच्यापासून विचलीत न होणारे भाई गणपतराव देशमुख यांचे जीवनकार्य आदर्शव्रत आहे त्यांच्या निधनाने शेतकरी कामगार कष्टकरी जनतेच्या न्याय चळवळीसाठी पोकळी निर्माण झाली आहे असे विचार वक्त केले. याप्रसंगी प्रामुख्याने कॉ.संजय मोरे,रामराव गवळी, ॲड प्रदीप मोरे,प्रा अर्जुन जाधव, ॲड प्रदीप गंगने,प्रा संग्राम मोरे,ॲड विजय जाधव, प्रा एन बी पठाण,कॉ विश्वमभंर भोसले, भाई एकनाथराव कवठेकर,प्रा. सुधीर अनवले,संजय चोरमले, भाई उदय गवारे यांनी दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या विविध कार्याची तसेच प्रसंगांची माहिती देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्श कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण भाई गणपतराव देशमुख आहेत. शेतकरी, कामगार, कष्टकरी, वंचित घटकाच्या प्रती कटिबद्ध राहून एकनिष्ठ पणे सातत्याने काम करणे हीच त्यांच्या प्रती खरी श्रद्धांजली ठरेल असे विचार व्यक्त केले.

या शोकसभेत प्रामुख्याने प्रा. दत्ता सोमवंशी,ॲड.भालचंद्र कवठेकर, ॲड.सुशिल सोमवंशी, डॉ. रब्बानी शेख, आत्माराम गिरी,ॲड. बी.जी.कदम,राजेंद्र गलांडे,भाई सतिष देशमुख, ॲड. योगेश शिंदे,ॲड. अश्विन जाधव,ॲड. राहुल क्षीरसागर, बाजीराव शिंदे,विनोद चव्हाण, भीम दुनगावे,प्रा.देविदास भोयर, प्रा.अनिल कुमार राठोर,शेख इलियास, प्रा. हनुमंत पवार, प्रा. विक्रम गिरी,विशाल कांबळे आदी उपस्थित होते.











