लातूर दि. ०३. राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचे लातूर रेल्वे स्थानकावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ना. गिरीशजी महाजन यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा पहिलाच लातूर दौरा असल्याने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह होता. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम काका शिंदे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
