पूरग्रस्तांना मदतकार्य

0
374

जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने २५० कीटचा ट्रक पुरग्रस्तांसाठी रवाना

मुरुम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) :उमरगा येथील जमियत उलेमा-ए-हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने संकटात सापडलेल्या पूरग्रस्त कुटूंबासाठी सोमवारी (ता.२) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या उपस्थितीत २५० कीट असलेल्या जीवनावश्यक वस्तुच्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण टोंपे, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, कॉ. अरुण रेणके, जमियत उलेमा-ए-हिंदचे, उमरगा तालुका अध्यक्ष मौलाना गुलाम नबी बलसुरी, तालुका सचिव हाफिज युसूफ, नगरसेवक आतीक मुन्शी, मुस्लिम जमात कमिटीचे तालुका अध्यक्ष बाबा औटी, रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला आदींची उपस्थिती होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी उदमले यांनी अशा आपत्तीच्या वेळी विविध सामाजिक संघटनांनी पुढे येवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करुन मुस्लीम युवक करत असलेल्या समाजकार्याचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक आघाव यांनी उमरगा हे सामाजिक सलोखा असलेला तालुका असून येथील नागरिक नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून येतात, असे मत व्यक्त केले. टोपे, जाधव यांची यावेळी भाषणे झाली.

यावेळी हाफीज वशीम मळगे, हाफीज मोहसीन, हाफीज एजाज शेख, कलीम पठाण, मदन शाह मूर्शद, परवेज सौदागर, तोफिक शेख, हाफिज सादिक, हाफिज सज्जाद,अब्दुल गनी शेख, अहमद शेख, अब्दुल अजीज खालीदी पुढाकार घेतला. हाफीज गुलाम नबी बलसुरी यांनी प्रास्ताविक केले. हाफीज युसुफ यांनी आभार मानले.

यासाठी शमसुद्दीन शेख, जफर पठाण, वजीर शेख, मेहराज मनियार, जहीर सय्यद आदींनी परिश्रम घेतले .

हाफिज युसुफ, जाहेद मुल्ला, इस्माईल शेख, वसीम नदाफ आदी युवक गाडीसह पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ट्रकसोबत रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here