औसा – औसा विधानसभा मतदारसंघातील ७७ पैकी ५२ ग्रामपंचायती भाजप समर्थक पॅनलने ताब्यात घेतल्या असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी या निवडणूकीत भाजप समर्थक पॅनलला कौल दिला आहे.

मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले.या निवडणूकीत औसा विधानसभा मतदारसंघातील औसा तालुक्यातील ४८ पैकी ३३ तर कासारसिरसी मंडळातील २९ पैकी १९ ग्रामपंचायती भाजप पक्षाने आपल्या ताब्यात घेतल्या आहे.गेल्या तीन वर्षांपासून आमदार म्हणून आ. अभिमन्यू पवार यांनी केलेल्या विकासकामांवर मतदारांनी विश्वास ठेवत हा कौल दिला आहे.औसा मतदारसंघात शेत तिथे रस्ता या अभियानातून संपूर्ण मतदारसंघात शेत रस्ते कामाचे जाळे निर्माण झाले आहे.यासह अनेक महत्वपूर्ण कामे या कालावधीत झाले असून मतदारांनी विकासाच्या कामांना ग्रामपंचायत स्तरावरून अधिक गती देण्यासाठी भाजप समर्थक पॅनलच्या ताब्यात ग्रामपंचायती दिल्याचे स्पष्ट या निकालातून दिसून येते..