24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeताज्या बातम्या*सुनील देशमुख यांचे दु:खद निधन*

*सुनील देशमुख यांचे दु:खद निधन*

महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक

इचलकरंजी, ( प्रतिनिधी) -सुनील देशमुख हे मूळचे सांगलीचे. 1964 साली एस.एस.सी. परीक्षेत बोर्डात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर शिक्षणासाठी ते मुंबईत आले. 1970साली मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागातून बी. केम. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले.

अमेरिकेमध्ये एम. एस. (केमिकल इंजिनिअरिंग), एम. बी. ए. या पदव्यांबरोबरच जे. डी. ही कायद्याची पदवीही त्यांनी मिळवली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. नंतर अमेरिकेतच कमॉडिटी ट्रेडर म्हणून वॉलस्ट्रीटवर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी व्यवसाय केला.

आज गिरीश, निशा व सुशील या तीन मुलांसह ते व त्यांची पत्नी प्रतिभा (पूर्वाश्रमीच्या प्रतिभा टिळक) अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. व्यवसायात नेत्रदीपक मिळवणाऱ्या यश श्री. सुनील देशमुख यांना साहित्य व समाजसेवा यांविषयी विशेष आस्था आहे. व्यवसायातून स्वेच्छेने निवृत्त झाल्यापासून आठवड्यातील काही काळ ते सामाजिक कामासाठी आवर्जून देत असतात.

सुनील देशमुख हे यु. एस्. मध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांत जुन्या ‘सियारा क्लब’ या संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. सियारा क्लबमार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचे ते शिल्पकार आहेत. तसेच त्यासाठी करावयाच्या निधी संकलन समितीचे प्रमुख आहेत. श्री. देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील ‘टाइम स्क्वेअर’मध्ये श्रीमती हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत ‘फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान मिळाला.

मराठी भाषा, समाज व संस्कृती यांबद्दल त्यांना प्रेम व कळकळ आहे. हे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन 1994 पासून महाराष्ट्र फाउंडेशनचे मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरू केली. 1996 पासून सामाजिक कार्य पुरस्कार योजनेसाठीही त्यांनी तेवढ्याच रकमेची व्यवस्था केली. 2008 पर्यंत या पुरस्कारांची निवड व वितरण कार्यवाही मुंबई येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ मार्फत होत होती; त्यानंतर ही कार्यवाही पुणे येथील साधना ट्रस्टमार्फत होत असे. मागील तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे संयोजन मासुम संस्था व साधना ट्रस्ट हे करीत आहेत.

सुनील देशमुख यांना विनम्र आदरांजली…

sunildeshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]