महेश पाळणे यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्रदान
लातूर : येथील क्रीडा पत्रकार महेश शिवहर पाळणे यांना नाशिकची ग्रामदेवता श्री कालिकादेवी मंदिर संस्थान व क्रीडा संस्कृती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील पत्रकारितेबद्दल गुरुवारी नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर सभागृहात प्रदान करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील, श्री कालिकादेवी मंदीर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव आनंद खरे, क्रीडा संस्कृती फाऊंडेशनचे सचिव उदय खरे, दिपक निकम यांची उपस्थिती होती. महेश पाळणे हे गेल्या १७ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत कार्यरत असून, आतापर्यंत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धेचे व खेळाडूंच्या कौशल्याचे वार्तांकन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
