मुंबई ;( विशेष प्रतिनिधी ) –
“चौथास्तंभ पुरस्कार ” हा विकास पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर
मध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांना आज प्रदान करण्यात आला.
यावेळीही व्यासपिठावर
विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री मंदार पारकर,
विशेष गौरवमूर्ती एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक
श्री अभिजीत पाटील,
अभिनेते श्री मंगेश देसाई, निमंत्रक श्री विवेक देशपांडे व रणजीत कक्कड उपस्थित होते.
या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.