25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeजनसंपर्क*डिजिटल मीडियातील व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी सरकार विचाराधीन-राजा माने*

*डिजिटल मीडियातील व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी सरकार विचाराधीन-राजा माने*

इचलकरंजी ता.९( प्रतिनिधी) — पत्रकार मूल्यांची जाण असणाऱ्या आणि त्याचे पालन करणाऱ्या डिजिटल मीडियातील व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी सरकार विचार करीत असल्याचे प्रतिपादन डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी केले.
इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
आम्ही इचलकरंजीकर, ॲड. दिलशाद मुजावर, मंगल सुर्वे, कृष्णात गोंदूकुपे याना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार गौरविण्यात आले.


राजा माने म्हणाले, कोरोना नंतर डिजिटल मिडियाचे महत्व वाढले आहे. मात्र या मीडियाला वळण लावण्याची गरज बनली आहे. पुढील पन्नास वर्षांचा काळ हा डिजिटल मीडियाचा असेल. हौस म्हणून डिजिटल मिडीयात येणाऱ्यांची हौस फार काळ टिकणार नाही. डिजिटल मीडियावर अनेक बंधने आणण्यासाठी सरकार विचार करीत आहे. अनेक वर्तमानपत्रे आणि पत्रकार मूल्यांची जाण ठेवून त्याची जपणूक करत आहेत. तशी जपणूक करण्याची जबाबदारी आता डिजिटल माध्यमांच्या पत्रकारावरही आलीआहे. त्यांनी पत्रकार मूल्यांची जपणूक केल्यास त्यांना संरक्षण देण्याचे काम करता येईल.

पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवावा.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले,पत्रकारिता आणि राजकारण या दोघांनी सांगड घालून काम करावे लागेल. प्रिंट मीडिया जबाबदारीने काम करीत आहे. त्यामुळे आजही अनेक वृत्तपत्रे जन्म घेत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व वाढले असले तरी त्यांनी जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. ब्रेकिंग न्यूज देताना संयम बाळगणे, खात्री करणे मग मत मांडणे आवश्यक आहे.


भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर,आयुक्त सुधाकर देशमुख,लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर यांची भाषणे झाली.वर्षभरात विविध क्षेत्रात यश मिळवल्याबद्दल दयानंद लिपारे,शरद सुखटणकर, रामचंद्र ठिकाणे,अरुण काशीद,अरुण वडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष शरद सुखटणकर यांनी केले पाहुण्यांची ओळख दयानंद लिपारे यांनी करून दिली तर आभार संजय कुडाळकर यांनी मानले.
यावेळी शशांक बावचकर,जयवंतराव लायकर,अशोक स्वामी,राहुल खंजिरे,सदा मलाबादे,सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]