22.1 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeआरोग्य वार्ता*बालरोग तज्ञासाठी लातूरात शुक्रवारी एमआयटीतर्फे पुर्नउत्थान कार्यशाळा*

*बालरोग तज्ञासाठी लातूरात शुक्रवारी एमआयटीतर्फे पुर्नउत्थान कार्यशाळा*

लातूर दि.१८ :- मराठवाड्यातील बालरोग तज्ञाकरिता लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग आणि लातूर बालरोग तज्ञ संघटना यांच्या वतीने दि २० जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी एक दिवसीय नवजात शीशू पुर्नउत्नाथ (Advanced NRP) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची कार्यशाळा आजपर्यंत केवळ मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथेच आयोजित केली जात होती. लातूरात होत असलेल्या या कार्यशाळेमुळे या भागातील बालरोग तज्ञांना मोठा फायदा होणार आहे.

           बाळ जन्मल्यानंतर ते ताबडतोब रडणे व त्याचा श्वास सुरळीत चालणे ही सर्वात महत्त्वाची बाब असून जी मुले रडत नाहीत किंवा श्वास चालू होण्यासाठी वेळ लावतात त्यांना एका विशिष्ट कार्य प्रणालीने श्वासोश्वास सुरू करणे ही बालरोग तज्ञाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. जन्मलेले बाळ वेळेत रडले नाही तर त्याच्या मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा सुरळीत होत नाही तेव्हा सदरील बाळ दगावते किंवा भविष्यात त्याला कायम अपंगत्व येते हे टाळण्यासाठी वेळोवेळी बालरोग तज्ञांना प्रशिक्षित होणे गरजेचे आहे.

          नवजात शीशू पुर्नउत्‍थान (Advanced NRP) या कार्यशाळेची गरज ओळखून लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभाग आणि लातूर बालरोग तज्ञ संघटना यांच्‍या मार्फत मराठवाड्यातील बालरोग तज्ञासाठी दि. २० जानेवारी शुक्रवार रोजी एक दिवसाची कार्यशाळा एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई रोड लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेत दिल्ली, पुणे आणि औरंगाबाद येथील सहा जणाची टीम कार्यशाळेत मार्गदर्शन देण्‍यासाठी येणार असून डॉ. नंदनी माळसे यांच्यासह अनुभवी तज्ञ प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षित करणार आहे. त्याचबरोबर एमआयटी मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागातील नवजात शिशु तज्ञ डॉ. दत्ता कुलकर्णी आणि डॉ. दीपिका माशाळकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.

            पुर्नउत्‍थान कार्यशाळा यापूर्वी केवळ मुंबई पुणे औरंगाबाद येथेच आयोजित केल्या जात होत्या लातूर येथे एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपप्राचार्य डॉ. बी.एस. नागोबा, शैक्षणिक चेअरमन डॉ. चंद्रकांत शिरोळे, यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयाचे कार्यकारी अधिकारी परमहंस मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा लातूर, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यातील बालरोग तज्ञांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती बालरोग विभाग प्रमुख डॉ विद्या कांदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]