29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*१लाख१ व्या वृक्षाचे रोपण*

*१लाख१ व्या वृक्षाचे रोपण*

लातूर – लातूर वृक्ष टीमच्या वतीने लातूरात एक लाख एकव्या वृक्षाचे रोपण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मंत्री दिलीपराव देशमुख, विद्यानंदजी सागर महाराज, माजी आमदार त्रंबकनाना भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, माजी नगरसेविका सौ. स्वाती घोरपडे, माजी नगरसेविका सौ. श्वेता यादव लोंढे, माजी नगरसेवक गिरीश पाटील, माजी नगरसेवक रवीशंकर जाधव, आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, शहाजी पाटील व इतर मान्यवरांच्याउपस्थितीत  ग्रीन लातूर वृक्ष टीमचे १लक्ष १ वे नारळाचे झाड लावण्यात आले.

१लक्ष१ वे वृक्ष लावण्याचा उपक्रम सोहळा अत्यंत देखणा झाला.ग्रीन लातूर वृक्ष टीमचेअध्यक्ष कडूनिबाचे झाड,  वडाचे, पिंपळाचे झाड यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी   गत १३३३ दिवसांपासून अहोरात्र श्रमदान करणाऱ्या ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. शहरात विविध प्रकारची देशी व दुर्मिळ झाडे लावावी, जैव वैविध्यता वाढवावी अशी सूचना केली. राधाकृष्ण मंदिर आश्रम गातेगाव चे विद्यानंदजी सागर  महाराज यांनी सध्याच्या काळात वृक्षांची लागवड व वृक्ष जोपासना सर्वानी करावी असे आवाहन केले.आमचा एकच पक्ष झाडावर लक्ष असे फलक लावून शहर हरित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व आध्यात्मिक गुरू यांना व्यासपिठावर एकत्रित आणल्याबद्दल संयोजकांचे कौतुक होत आहे.माजी नगर सेविका स्वाती घोरपडे व माजी नगरसेविका श्वेता लोंढे यादव, डॉ. कल्याण बरमदे यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले.

ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ.पवन लड्डा, माजी नगरसेवक इम्रानजी सय्यद, बाळासाहेब बावणे यांनी प्रास्ताविक माहिती दिली, आकाश सावंत व विदुला राजमाने यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड वैशाली यादव यांनी आभार व्यक्त केले. सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी परिसरातील ग्रीन बेल्ट मध्ये झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.परिसरातील भिंती स्वच्छ करून त्यास रंग रंगोटी करून त्यावर वारली चित्र काढण्यात आले., परिसरात १२० फुलझाडे लावण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदमाकर बागल, मनीषा नारायणकार कोकणे, तुळसा राठोड,सुलेखा कारेपूरकर, प्रो. मीनाक्षी बोडगे, रोहिणी पाटील, पूजा पाटील, विदुला राजमाने, कल्पना कुलकर्णी, दीपाली रजपूत, मुकेश लाटे, निता कानडे, विकास कातपुरे, मोईज मिर्झा, शुभम आवाड, दीपक नावाडे, भगवान जाभाडे, दयाराम सुडे, समृद्धी फड, कृष्णा वंजारे, विक्रांत भूमकर, सुरज साखरे, अविनाश मंत्री, पांडुरंग बोडके, अरविंद फड, डॉ.अमृत पत्की, बाळासाहेब बावणे, राहुल माने, नागसेन कांबळे, अभिषेक घाडगे, विजयकुमार कठारे, नितीन पांचाळ, बळीराम दगडे, गणेश सुरवसे, महेश गिल्डा, विजय मोहिते, केंद्रे ज्ञानोबा, अभिजित चिल्लरगे, आकाश चिल्लरगे, नितीन पांचाळ, कांत मरकड, घोडके अप्पा, अमोल बिराजदार यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]