भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी दिनकर कवडे यांची निवड..
निलंगा-( प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य दिनकर कवडे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पञाव्दारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवड करून त्यांचा यथोचित सत्कार जनसेवा कार्यालयात करण्यात आला.
माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृृत्वाखाली प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी दिनकर कवडे यांची निवड करण्यात आली तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेञात योगदान असल्याने आपल्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवड करण्यात आली आहे त्यांना पुठील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी दिनकर कवडे यांना सदर नियुक्तीपञ मिळाल्यानंतर संवाद साधताना म्हणाले, मला पक्षाने दिलेली जबाबदारी संघटनात्मक बांधणीसाठी आणि समाजाच्या संघटन बांधणी हाच यशाचा नवामंञ असल्याने येणार्या प्रत्येक निवडणुकीत मी सक्रीय राहुन बांधणी करून संघटनात्मक काम पक्षासाठी करणार असल्याचे सांगितले.
या अभिनंदनात भाजपाचे सचिव पंकज कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे,निटूर शक्तिकेंद्र प्रमुख विजय देशमुख,निटूर सर्कलचे युवा नेते अशोक शिंदे,माजी उपसरपंच संगमेश्वर करंजे,सतिश शिंदे,दत्ता शिंदे,प्रशांत साळुंके आदी जणांची उपस्थिती होती.




