सांबनगरी ( ढोबळेवाडी ) येथील प्रसिध्द शेतकरी रामअण्णा बाबनप्पा बुडगे यांचे निधन
निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील सांबनगरी ( ढोबळैवाडी ) येथील रामअण्णा बाबनअप्पा बुडगे यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यराञी 12:30 वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या शेतात बेलपञी वाहुन अंन्त्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे ( वय-80 वर्ष ) होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन मुली,सुना-नातवंडे असा परिवार आहे.
निटूर व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष नागाप्पा बुडगे,व्यापारी बालाजी बुडगे,शेतकरी बाबु बुडगे यांचे ते वडील होते.याप्रसंगी निटूर व्यापारी मंडळाच्यावतीने दोन तास व्यापार बंद ठेवून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली रामअण्णा बुडगे यांचा स्वभाव दिलदार होता त्यांची दु:खत वार्ता कळाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आले.




