निटूर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबीर आणि छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची मिरवणुक उत्साहात संपन्न..
गावात भगवमय वातावरण
निलंगा-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील निटूर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गावातील प्रभागात व हायवेच्या लातूर-निटूर महामार्गावर झेंडे आणि बॅनरबाजी करून गाव भगवमय करण्यात आले.तसेच,दि.१९ रोजी छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून पुष्षहार माल्यार्पण करण्यात आले बाल-गोपाळांनी छञपती शिवाजी महाराजांच्या आढवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
तसेच,छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला यांच्या उपस्थितमध्ये छञपती शिवाजी महाराज की जय म्हणत घोषणाबाजी देण्यात आले आणि गाव या निनादात न्हावून निघाले.रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे पाहुन गावातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व लातूर ब्लड बॅंकेच्या संयुक्तरित्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यात ५० रक्तदान केले रक्तदान करून आपले कर्तव्य बजावत शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दि.२० रोजी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या माध्यमातून गावातून छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची मिरवणुक ही डीजे सिस्टीमनुसार गाजविण्यात आली.तसेच,प्रत्येक गाण्याच्या माध्यमातून शिवप्रेमी थिरकताना दिसत होते.याप्रसंगी गावातील शिवप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.