भगवत गीता जगाला शांततेचा मार्ग दाखवेल-डाॅ.संजय उपाध्ये.
लातूर ;( प्रतिनिधी)-
भगवत गीता जगाला शांततेता मार्ग दाखवेल तोच यशाचा प्रगतीचा,आनंदी जीवनाचा मार्ग आहे असे उदगार
गप्पाष्टककार व निरूपमकार डाॅ.संजय उपाध्ये यांनी काढले. प्रसंग होता. ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सादर केलेल्या प्रवचन मालेवर अतुल ठोंबरे यांनी ” लिहलेल्या चैतन्य सत्संग ” पुस्तिकेच्या प्रकाशनचा.
यावेळी श्री जानाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डाॅ.वैशाली टेकाळे, श्री जानाई प्रतिष्ठान विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष अवधुत जोशी, श्री जानाई प्रतिष्ठानचे पहिले अध्यक्ष सुनिल अयाचित उपस्थित होते.

कै.सदाशिवराव दाते काका यांच्या स्मृतीदिनी
या वर्षी प्रमोद गॅस एजन्सी समोरील मैदानावर
दाते परिवार व चैतन्य मंडळाच्या वतीने ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते विषय होता ‘दैवी संपत्ती- ज्ञान, योग व्यवस्थिती ”. तीन दिवस श्रोते ह.भ.प. चैतन्य महाराजांच्या अमृतवाणीने न्हाऊन निघाले. लातूरकरांनी यास भरभरून प्रतिसाद दिला. महाराजांनी आपल्या रसाळ वाणीत विविध उदाहरणे देत प्रवचने सादर केले. प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाचे ठळक मुद्दे अभियंता अतुल ठोंबरे यांनी चैतन्य सत्संग या पुस्तिकेत संकलीत केली आहेत. ह्या पुस्तिकेचे प्रकाशक श्री जानाई प्रतिष्ठान लातूर आहेत तर अक्षर जुळणी, मांडणी, मुखपृष्ठ के के ग्राफीक यांनी केले आहे.चैतन्य सत्संग ही पुस्तिका पंचांगकर्ते धुंडाराजशास्त्री दाते यांचे चिरंजीव कै.सदाशिवराव दाते यांना समर्पित करण्यात आली आहे.





