22.8 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने लातूर शहरात दिव्य सत्संगचे आयोजन*

*आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने लातूर शहरात दिव्य सत्संगचे आयोजन*


लातूर:.
अध्यात्मिक गुरु तथा आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता लातूर शहरातील कस्तुराई मंगल कार्यालय औसा रोड, लातूर येथे भव्य अशा दिव्य सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या देखण्या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आव्हान संयोजकांनी केले आहे.गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांनी आर्ट ऑफ लिविंग ही संस्था 1981 मध्ये स्थापन केली आर्ट ऑफ लिविंग ही एक शैक्षणिक व मानवी जीवन सहज सुंदर व हितकारी करणारी चळवळ आहे. ती तणामुक्ती आणि सेवा उपक्रमामध्ये अविरत कार्यरत आहे. ही संस्था जगातील 184 पेक्षा अधिक देशांमध्ये सक्रिय असून त्यांनी पन्नास कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे.तणाव मुक्त मन आणि हिंसामुक्त समाज असल्यावर विश्वशांती मिळवता येते या श्री श्री च्या शांतता तत्वाला अनुसरून दिशा मिळते. प्रत्येक व्यक्तीला तणावापासून मुक्ती आणि मनशांती अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे जगभर तणामुक्तीचे कार्यक्रम सुरू आहेत. निरोगी शरीर आणि शांत प्रसन्न मन याकरिता सर्वांसाठी आर्ट ऑफ लिविंग चे विविध कोर्सेस सातत्याने चालवले जातात. यात प्रामुख्याने श्वाशन क्रियेसह सुदर्शन क्रिया, ध्यान आणि योगासनाचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना तणाव नैराश्य आणि हिंसक मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे. जीवनाची गुणवत्ता वाढवून देणारी आनंदाची ही अनुभूती करोडो लोकांनी अनुभवली आहे.संपूर्ण विश्वात आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवस 13 मे मोठ्या  हर्ष उल्लासात साजरा केला जातो.

अनेक संशोधन करून विज्ञानाने सैद्धांतिक मान्यता दिलेल्या सुदर्शन क्रियेचे जनक असलेल्या गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार लातूर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 13 मे रोजी सायंकाळी सहा वाजता वाढदिवस साजरा करत आहे. या भव्य उत्सव आणि दिव्य सत्संग सोहळ्यासाठी लातूर परिवाराच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली असून गुरुपूजा सत्संग ध्यान प्रसाद व विशेष संगीत रजनीचे नियोजन करण्यासाठी प्रशिक्षक व समाजसेवक परिश्रम घेत आहेत. जाती धर्म अथवा लिंगभेद विरहित वैज्ञानिक दृष्टिकोनातून आर्ट ऑफ लिविंग चे कोर्सेस सर्वांसाठी खुले असतात.आर्ट ऑफ लिविंग चळवळीने विविध मानवतावादी सामाजिक प्रकल्पाच्याद्वारे समुदायांमध्ये विकास आणि प्रगतीला चालना दिली आहे. ज्या प्रकल्पामध्ये विविध क्षेत्राचा समावेश आहे एकात्मिक समुदाय विकास प्रकल्प, शिक्षण ,आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, महिला  सक्षमीकरण आणि बाल संरक्षण ,आपत्ती निवारण, कैद्यांचे पुनर्वसन आणि संघर्ष निराकरण, चे कार्य निरंतर चालु आहे.सद्या जगातील सर्वात मोठी समस्या ही पाण्याची उपलब्धता ही आहे यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून देशभरातील बारा राज्यांमध्ये 72 पेक्षा अधिक नद्यांचे पुनर्जीवन चे काम चालू आहे

.या माध्यमातून मृत नद्यांना पुनर्जीवन मिळाले आहे व आज देशभरातील करोडो लोकांना पाण्याची उपलब्धता झाली आहे. सोबतच या नदी काठावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून कायमस्वरूपी नद्या सजीव ठेवण्याचे काम चालू आहे.शांती बंधुभाव व सद्भावना कायम राखण्यासाठी आणि जगभरातील लोकांना आनंदी व प्रेमाने  जीवनशैलीचा अवलंब करून हिंसामुक्त दिव्या समाजाच्या निर्मितीत दिलेले अतुलनीय योगदान बद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे तर जगभरातील 50 पेक्षा अधिक देशाने त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे . या भव्य व देखण्या सोहळ्यासाठी शहरातील  नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]