27.5 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeशैक्षणिक*JEE Advanced 2023 परीक्षेत त्रिपुरा महाविद्यालयाची उत्तुंग भरारी*

*JEE Advanced 2023 परीक्षेत त्रिपुरा महाविद्यालयाची उत्तुंग भरारी*

लातूर ; दि.१७ -( प्रतिनिधी)-

आयआयटी गुवाहटी द्वारे घेण्यात आलेल्या JEE Advanced 2023 परीक्षेत Reliance Latur Pattern च्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश मिळवून लातूर मधील यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे. हया वर्षी JEE Advanced ही परिक्षा आयआयटी गुवाहटी द्वारे 4 जुन 2023 रोजी 2 सत्रामध्ये आयोजीत करण्यात आली होती त्या परिक्षेचा निकाला आज रोजी सकाळी 10 वाजता लागला. या परिक्षेत संपूर्ण भारतातून 183072 विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होतीत्यातील 43773 विद्यार्थी पात्र ठरले.   

त्यात महाविद्यालयातून एकूण 3१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी तब्बल १० विद्यार्थी JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये चि. युवराज शाहु  (CRL-९८९),  चि. शिंदे तन्मय(CRL-१३८९) व चि. शुभम माटे (२०१८) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यासोबतच  चि. शिवनगे शिवम (CRL-2726),चि. जैन अवंत (४३१९),चि. काले आलोक(CRL-4992),चि. थोरात विश्वतेज (CRL-५७५३), चि. रहिम सय्यद  (CRL-9516), चि. शिवाजी सावंत (CRL-11233) व कु.भागवत गार्गी (CRL-११७१०) हे विद्यार्थी देखील JEE Advanced 2023 परिक्षेमध्ये पात्र ठरले. 

मूलतः सर्वसाधारण गुणवत्तेच्या मुलांमधून सुद्धा असाधारण निकाल देणारी संस्था म्हणून रिलायन्स लातूर पॅटर्न प्रचलित होत आहे. वेळ शक्तीचा अपव्यय टाळत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सर्व सुविधा रिलायन्सने पुरविल्या. गुणवत्ता, सातत्य सुरक्षितता या बाबींना महत्व देत रिलायन्स लातूर पॅटर्न निकालाधिष्टित संस्था म्हणून उत्तम कार्य करत आहे

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, संस्थेच्या सचिव, प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम तसेच विद्यार्थी, पालक शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी धुमधडाक्यात निकाल साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]