नवी दिल्ली, 1 : युवा पत्रकार संघ, कोल्हापूर येथील पत्रकार सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. दिल्ली अभ्यासदौ-यावर असणा-या युवा पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. शिवाजी शिंगे यांच्यासह 14 पत्रकारांनी कार्यालयास भेट दिली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. शिवाजी शिंगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती प्रभारी उपसंचालक अरोरा यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यातयेणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत माहितीही श्रीमती अरोरा यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, कू, फेसबुक पेजेस, युटयुबचॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप ग्रुप आदीं समाज माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारी प्रसिध्दी कार्याची श्रीमती अरोरा यांनी माहिती दिली. सर्व पत्रकार सदस्यांना यावेळी लोकराज्य अंकाच्या प्रती भेटस्वरुपात देण्यात आल्या.
0000000000




