34.5 C
Pune
Friday, March 27, 2026
Homeठळक बातम्या*मोबाईल चोरटे मुद्देमालासह जेरबंद*

*मोबाईल चोरटे मुद्देमालासह जेरबंद*

             

   लातूर *दिनांक 10/11/2023* (   वृत्तसेवा)    *मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 2 आरोपींना मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.10 मोबाईल व एक मोटरसायकलसह 1,60,000 /-रुपयांचा मुद्देमाल जप्त.*..

             या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही दिवसांपूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत एकास अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे  392, 34 भादवि कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले.
          सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दिनांक 08/11/2023 रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे.

1) सौदागर उर्फ सौद्या अशोक हजारे, वय 20 वर्ष, राहणार राम कृष्ण नगर, लातूर.

2) रवी भुजंग कसबे,वय 19 वर्ष,राहणार लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर.

                यांना लातूर शहरातील जुना औसा रोड परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांनी मिळून मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या इसमाना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील चोरलेले एकूण 10 मोबाईल, गुन्हे करताना वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण 1,60,000/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
            सदरच्या आरोपी कडून जप्त केलेल्या मुद्देमालावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे जबरी चोरी संदर्भात दाखल असलेला एक गुन्हा उघड झाला असून विविध ठाण्याचे अभिलेखा वरुन लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेले आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
            गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी,अमलदार तपास करीत आहेत. 

             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]