लातूर वृक्ष टीमचा उपक्रम

0
405

 

राणी अहिल्यादेवी होळकर चौकाची स्वच्छता.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
नवीन रेणापूर नाका येथील राणी अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आज ग्रीन लातूर वृक्ष टीममार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मुख्य चौकात शोभीवंत झाडांभोवती खूप गवत वाढले होते. ते सर्व गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. गेल्या वर्षी लावलेल्या शोभीवंत झाडांची छाटणी करून झाडांना आकार दिला. सर्व झाडांना काठ्या लावून आधार दिला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, दयाराम सुडे, राहुल माने, आशा अयाचित, पूजा पाटील, कपिल काळे, अरविंद फड, ज्ञानोबा केंद्रे, खाजा पठाण, असिफ तांबोळी, नितीन कामखेडकर, कांत मरकड यांनी परिश्रम घेतले.
   ८२१ दिवसांपासून अखंड, अविरतपणे वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, शहर सुशोभीकरण चे कार्य करत ग्रीन लातूर वृक्ष टीमने लातूर शहरात सर्वत्र हिरवळ निर्माण केली आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. रविवारी भगवान बाबा जयंती उत्सव समिती लातुर यांचे द्वारे व भुसनी ग्रामपंचायत यांचे द्वारे ग्रीन लातूर वृक्ष टीमचा यथोचित सत्कार करण्यात आला.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳
नंंंंं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here