25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसांस्कृतिक*गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने होणार ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचा शुभारंभ*

*गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने होणार ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचा शुभारंभ*

१७ दिवस चालणार उत्सव

देवस्थानकडून उत्सवाची जय्यत तयारी 

 लातूर/प्रतिनिधी:लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री १२  वाजता गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने प्रारंभ होणार आहे.यंदा यात्रा महोत्सव १७ दिवस चालणार असून देवस्थानच्या वतीने उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

     ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी विविध भागातून नागरिक येथे येत असतात.शुक्रवार दि.८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी होते. मध्यरात्री १२ वाजता परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक होतो.त्यानंतर दर्शन खुले केले जाते. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्रींची महापूजा व झेंडावंदन होणार आहे यानंतर माळी भजनी मंडळ व माळी बांधवांकडून मिरवणूक काढत पुष्पवृष्टी संपन्न होईल.शुक्रवारीच श्रीमती सरस्वती कराड रक्त केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदिरापासून झेंड्याच्या काठींची मिरवणूक निघणार आहे. लातूर शहर व परिसरातील भक्त आणि नागरिकांनी यात्रा महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक सचिन जांबुतकर व देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

 महिला दिनानिमित्त विविध उपक्रम 

   यावर्षी योगायोगाने जागतिक महिला दिनी दि.८ मार्च रोजी यात्रा महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.त्यामुळे देवस्थानच्या वतीने विविध विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे.याशिवाय महिला तक्रार निवारण केंद्राचा शुभारंभ होणार आहे.प्रथमच महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची महापूजा संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]