- *विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याकडून 109.40 चा हप्ता जाहीर*
विलासनगर :– विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप झालेल्या ऊसाला यापूर्वी प्रति मे.टन रुपये 2200 (दोन हजार दोनशे) प्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम ऊस पुरवठा केल्यानंतर ज्या-त्या वेळी आदा करण्यात आलेली आहे.
सध्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पोळा, गौरी गणपती सणासाठी असलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन, कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक मा.श्री दिलीपरावजी देशमुख साहेब,मा.ना.अमित विलासरावजी देशमुख साहेब व मा.आ.धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हंगाम 2020- 21 मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे. टन रुपये 109.40 (एकशे नऊ रू. चाळीस पैसे) या प्रमाणे हप्त्याची रक्कम आदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्याप्रमाणे होणाऱ्या ऊस बिलाची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. तरी संबंधित ऊस पुरवठादारांनी त्यांची रक्कम बँकेतून उचल करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन व्हा.चेअरमन मा. श्री. श्रीशैल उटगे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.












