‘सबका साथ सबका विकास‘ हे उद्दिष्टही साध्य….
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा प्रधान मंत्री मोदी यांचे हस्ते लोकार्पण सोहळा.
लातूर ; ( वृत्तसेवा ) -मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये मोठे उद्योग यावेत या दृष्टीने पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मिती कारखाना बनवण्याचा निर्णय झाला. याचा शुभारंभ येत्या १२ तारखेला होणार आहे. नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथून ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करणार आहेत.
लातूरच्या विस्तारित औद्योगिक वसाहतीमध्ये 350 एकर मध्ये भव्य दिव्य अशा मराठवाडा रेल्वे कोच बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला. ज्यामधून दरवर्षी 250 वंदे भारत रेल्वेचे कोच तयार होणार आहेत. या कारखान्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवकांच्या रोजगाराची स्वप्नपूर्ती होणार असून ‘सबका साथ सबका विकास‘ हे उद्दिष्टही साध्य होतेय.

या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा लोकार्पण सोहळा माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे दि. 12 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता फॅक्टरीच्या आवारात प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेला आहे.
लातूर लोकसभेचा खासदार सुधाकर शृंगारे यांनी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री . श्री. अमितभाई शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री. श्री. रावसाहेब दानवे, लाडके उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आदींसह सर्व मान्यवरांचेही आभार मानले आहेत.

या भव्य दिव्य अशा कोच फॅक्टरीचे लोकार्पण कार्यक्रमात सर्व लातूर लोकसभेतील जनतेने या नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे .





