नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात व्यापक प्रमाणात राष्ट्रहित,
समाजहित आणि मानवता हित-पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका
लातूर दि.३१– सामान्य नागरिकांचे भावविश्व नेतृत्वावर अवलंबून असते. देशाच्या संस्कृतीक आणि परंपरेचे कार्य हेच नरेंद्रजी मोदी यांचे जीवन कार्य असून व्यापक राष्ट्रहित, समाजहित, पारिवारिक हित आणि व्यापक मानवतेचे हित मोदीजींच्या नेतृत्वात असल्याने त्या दृष्टीने विचार करायला हवा. येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जगाच्या पाठीवर भारताचे नाव निश्चितपणे अधिक उज्वल होईल असे मत पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वैद्यकीय क्षेत्रात सह विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी नागरिकांचा पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांच्याशी शनिवारी सायंकाळी लातूर येथील प्रयाग निवासस्थानी सुसंवाद घडवून आणला यावेळी नरेंद्रजी मोदी यांच्या आजपर्यंतच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून डॉ. कुकडे काका यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. प्रारंभी आ. रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून स्वागत केले याप्रसंगी लातूर एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार, शैक्षणिक संचालक डॉ चंद्रकांत शिरोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी संवाद साधताना डॉ. कुकडे काका म्हणाले की, नरेंद्र मोदी स्वतःच्या इच्छेने राजकारणात आले नाहीत. पूर्णवेळ संघाचे काम करीत असताना त्यांचे संघटन कौशल्य पाहून स्व. अटलजींनी दिल्लीत संघटनमंत्री म्हणून पक्षाच्या कामात घेतले. तात्कालीक उपाययोजना म्हणून मोदीजींना गुजरातचे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. पहिल्या दोन वर्षात त्यांना गोध्रा आपत्ती आणि कच्छ भूकंप या दोन संकटांना तोंड द्यावे लागले. खूप बदनामी झाली अनेक चौकशांना त्यांना सामोरे जावे लागले.

मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही अथवा आजारी पडले नाहीत १८-२० तास काम करत आहेत पंतप्रधान असतानाही त्यांचे कुटुंब सामान्य अवस्थेत जगत असून व्यक्तिगत, कौटुंबिक अथवा कुठलेही हितसंबंधाची जोपासना केली नाही. याच विचाराची आणि विविध क्षेत्रातले ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न व निस्वार्थ भावनेने काम करणारी टीम तयार केली कधीच राजकारणात नसणाऱ्यांना केंद्रीय मंत्री केले. मोदीजींनी सर्वांसाठी काम केल्याने देशातील गरीब आणि श्रीमंत दोन्हीही वर्ग मानतात. महानगरापासून खेड्यापर्यंत मोठी उपलब्धी दिसून येत आहे. लक्षणीय मूलगामी बदल आणि देशाचे चित्र बदलण्याचे काम केले याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे मोदीजींना आणखी पाच वर्ष मिळाली तर जगाच्या पाठीवर भारताचे नाव अधिकतेने उज्वल होईल असेही डॉ कुकडे काका यांनी बोलून दाखवले.

देशाच्या सांस्कृतिक वारसा आणि निसर्गदत्त कार्य जगासमोर आणि देशासमोर मोदीजींनी आणला परदेशी पाहुण्यांना भेटवस्तू काय द्यावी त्यांना देशातील काय दाखवावे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन काम केले असे सांगून डॉ अशोकराव कुकडे काका म्हणाले की भारत पराक्रमी आणि बलशाली बनत असून शांततेचा वारसा या दोन्ही परस्पर असणाऱ्या गोष्टी एकाच हातात घेऊन पुढे जात आहे जगाला याचीच गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

सामान्य नागरिकांचे भावविश्व काय असावे हे नेतृत्वावर अवलंबून असते असे सांगून डॉ. कुकडे काका म्हणाले की देशाच्या मनात काय आहे त्या पद्धतीने काम झाले पाहिजे मात्र सामाजिक परिवर्तन खूप सावकाश होत असते समाजातील सगळ्या स्तरापर्यंत पोहोचणे खूप अवघड असते सामाजिक परिवर्तन होत असताना विरोधक संघटितपणे एक होतात अशाच पद्धतीने विविध क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात काहीच करू शकले नाहीत अशा भाई भतिजा स्वतःचेच कल्याण करणारे जातिवाद जोपासणाऱ्यांची या देशात इंडिया आघाडी उभी राहिली असल्याचे आणि त्यांच्या कडून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न भारताचे आहे जगाला योग्य प्रकारे विचार देण्याचे स्थान आहे हे केवळ काल्पनिक नसून वास्तविक असू शकते त्या वास्तव्याकडे वाटचाल करण्याचा हा लोकसभा निवडणुकीचा टप्पा असल्याचे सांगून पद्मभूषण डॉ. अशोकराव काका कुकडे म्हणाले की समाजावर प्रभाव टाकणारे बुद्धिजीवी आपण सर्वजण आहोत मत देताना विचार करणे गरजेचे आहे देशहिताचा आणि समाज हिताचा विचार करून आपण निश्चितपणे निर्णय घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने ग्रामीण भागाला मूलभूत सुविधाही पुरवता आल्या नाहीत नरेंद्र मोदी यांनी मजबूत घराबरोबरच शुद्ध पाणी वीजपुरवठा गॅस यासह अनेक योजना गोरगरीब सर्वसामान्य जनतेला पुरविल्या देश आत्मनिर्भर करण्याबरोबरच देशाला उंचीवर नेऊन ठेवले अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले कोरोनाच्या काळात वॅक्सिन बरोबरच औषध पुरवठा करून देशवासीयांना मोठा दिलासा दिला असल्याचे सांगून आ रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलताना लातूर जिल्ह्यात अकरा हजार कोटी रुपयांचे रस्ते झाले असल्याची माहिती दिली. दातृत्व असणारा, साधा भोळा गरिबीची जाण असणारा माणूस सुधाकर शृंगारे आहेत यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तेव्हा देशाच्या भवितव्यासाठी आणि विकास कामांना साथ देण्यासाठी भाजपाला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन केले.
प्रारंभी डॉ एन. पी. जमादार, डॉ चंद्रकांत शिरोळे यांनी आपली मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी डॉ बसवराज नागोबा यांनी आभार व्यक्त केले या संवाद कार्यक्रमास डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. ज्ञानेश्वर चिते, डॉ. सरिता मंत्री, डॉ.हंसराज बाहेती, डॉ. एस. एन. जटाळ, डॉ. मन्मथ भातांब्रे, डॉ. दिलीप देशमुख, डॉ चंद्रकला पाटील, डॉ अनिल राठी, सचिन मुंडे, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. राजेंद्र मालू, डॉ. पल्लवी जाधव, डॉ.विद्या कांदे, डॉ. शैला बांगड, डॉ. क्रांती केंद्रे, डॉ. बसवराज वारद, डॉ. लक्ष्मण कस्तूरे, डॉ. सोमानी, डॉ. बबन आडगावकर, डॉ. पिचारे मॅडम, डॉ. सचिन भावठाणकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




