निलंगा येथे आयोजित कार्यकर्ता अधिवेशनात माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विधानसभा मतदारसंघ बदलणार ? माजी मंञी आ.राम शिंदे यांचे सूचक वक्तव्य..
निलंगा-(प्रतिनिधी)विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने निलंगा येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात माजी मंञी आ.राम शिंदे यांनी काॅंग्रेला टक्कर देण्यासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘पक्षाने ठवरलं तर तुम्हाला लातूर शहर विधानसभा मतदारसंघातूनही निवडणुक लढवावी लागेल.याबाबतही तयारी ठेवा,अशा सूचना माजी मंञी आ.राम शिंदे यांनी निलंगा येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांना केली.पुढे ते म्हणाले,विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकवेळा जनतेला पसंती नसलेल्या उमेदवाराची उमेदवारी लादली जाते.माञ जनतेच्या मनातला उमेदवार असणे गरजेचे आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे.यासाठी या घातलेल्या या अधिवेशनाचा उपक्रम राज्याला दिशा देणारा आहे.

लातूर जिल्ह्यातून एकीकडे माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर,माजी मुख्यमंञी विलासराव देशमुख,केंद्रीय मंञी शिवराज पाटील चाकूरकर काॅंग्रेसचे दिग्गज होते.येथील राजकारणात काॅंग्रेसचे वर्चस्व होते.अनेक वर्षापासूनचे असलेले वर्चस्व मोडून जिल्हा परिषद,महानगरपालिका,पंचायत समिती,बाजार समित्या,नगरपरिषदा भाजपाकडे खेचून आणल्या आहेत,असे माजी मंञी आ.राम शिंदे म्हणाले.
निलंगा येथे झालेल्या अधिवेशनात यावेळी माजी पालकमंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी आ.गोविंद केंद्रे,जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,अजित पाटील कव्हेकर,भगवान पाटील,रोहीत पाटील आदी जणांची उपस्थिती होती.




