मुक्त छंद

0
246

✍️जीवन उलगडताना….✍🏻

🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️

मी ..ज्या पद्धतीचे जीवन जगत असतो.त्या पद्धतीने जगणं म्हणजेच योग्य प्रकारे जगणं आहे.

असा अनेक लोकांचा,समूहाचा अगदी धर्माचा सुद्धा समज असतो. अशा या समजातून जन्म घेते ती तुलना.. मग आपण आपल्यापेक्षा वेगळं राहणारे, वेगळं वागणारे,वेगळं बोलणारे यांच्याशी सातत्यानं तुलना करत राहतो.

आपलंच वागणं,आपलंच जगणं, आपल्याचं चालीरिती दुसऱ्यापेक्षा कशाबरोबर आहेत.याचं लॉजिक किंवा तर्कशास्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत असताना.आपल्या मनावर प्रचंड ताण येत असतो.😠

दैनंदिन जीवनात साधारण आपलं मन अशा प्रकारे तुलना करतं.. जर आपण मांसाहारी🍗🍳असलो आणि पुढचा शाकाहारी🍍🥬 असला तर मांसाहार करण कसं बरोबर आहे.हेच आपण सांगत राहतो.

अजुन एक उदाहरण ..

जर पण👕👖 आधुनिक कपडे घालत असू.तर पारंपारिक कपडे कशी आता योग्य नाही,किंवा त्याच्या उलट ही …. आपण आपल्या मनाशी युक्ती वाद करत राहतो.

जर आपल्याकडे 🏍️दोन चाकी गाडी आहे आणि दुसऱ्या कडे🚘 चार चाकी गाडी आहे.तर दोन चाकी गाडीचे फायदे सातत्याने आपण आपल्या मनाला पटवून देत असतो.

किंवा एखादा सण 🎉साजरा करत असताना आमच्या पद्धतीने साजरा करणार कसं विज्ञानाशी धरून आहे आणि दुसऱ्याचं साजरा करणार हे कसं अंधश्रद्धेची जोडला गेलेला आहे हे आपण विचार करत असतो.

मग बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की अरे माझ्या या चालीरीती पेक्षा किंवा या माझ्या दृष्टिकोन पेक्षा दुसर्‍याचा दृष्टिकोन चांगला आहे. आणि तिथून तणावाला सुरुवात होते.

हे सत्य जेव्हा मला उमगलं तेव्हा मी माझ्या मनाशी विचार केला.

या तणावातून मी कसा दूर होऊ शकतो?

खोलात गेल्यावर माझ्या लक्षात आलं.असा तणाव दूर करण्याची सोपी पद्धत आहे.

आपण आपल्या मनाला असं सांगायचं की, माझ्या पद्धतीची आणि दुसऱ्याच्या पद्धतीची तुलना करण्यापेक्षा ती एक वेगळी पद्धत आहे.त्यात त्यांना आनंद आहे.माझी एक वेगळी पद्धत आहे.त्यात मला आनंद आहे.असा विचार केला.तर माझा तणाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

तणावमुक्ती च्या दिशेने एक पाऊल..🚣🏻‍♂️👉🏻

©️ कपिल कुलकर्णी,लातूर

(Software Engineer)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here