भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांनी मानले आभार
लातूर;( प्रतिनिधी) – लातूर शहरासह जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. लातूर शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी जाऊन शेकडो कुटुंबियांचे वेगवेगळे नुकसान झालेले होते. या नुकसान झालेल्यांना सरकारची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला होता.
या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून लातूर शहरातील १०९ कुटुंबियांना सरकारकडून मदत जाहीर झाली आहे. सदर मदत जाहीर झाल्याबद्दल लातूर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरात अवकाळी पावसाने घुमाकुळ घातलेला होता. या काळात विवीध ठिकाणी विक्रमी पाऊस झाल्याच्या नोंदी झाल्या होत्या. लातूर शहरात या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे लातूर शहरातील विवीध भागातील नागरिकांना या अवकाळीचा मोठा फटका बसला. अतिवृष्टीने अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या संसार उपयोगी साहित्यासह वेगवेगळे नुकसान झालेले आहे. अनेकांना या अवकाळीमुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. ही बाब लक्षात घेऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी राज्य सरकारकडे केली होती. या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.

अजित पाटील कव्हेकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून लातूर शहरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. १०९ कुटुंबियांना आज दि. ०५ जुलै रोजी ही मदत देण्यात येणार आहे. सदर मदत जाहीर केल्याबद्दल भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानले आहेत. राज्य शासन हे समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करणारे असून हक्काचे व संवेदनशील सरकार असल्याने उर्वरित नुकसानग्रस्त कुटुंबाना मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.