लातूरः दि .7( माध्यम वृत्तसेवा) येथील श्री गुरुजी आयटीआय संस्थेमध्ये प्रवेशासाठी गर्दी पडत असून ,विद्यार्थ्यांनी या संस्थेमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे. झिया सय्यद या विद्यार्थ्यांनी 2025 प्रवेश प्रक्रीयेत इलेक्ट्रीशियन शाखेत प्रवेश घेऊन प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ केला .
यावेळी प्राचार्य अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत केले. या प्रसंगी प्रवेश विभागातील बाबा डोंगरे ,जी टी जोशी , होळकर , पी व्ही देशमुख , रणजीत कदम ,अभिषेक दुडीले यांची उपस्थिती होती. श्री गुरूजी आय टी आय म्हणजे तंत्र शिक्षणासोबत संस्कार देणारी लातूर मधील एकमेव आय टी आय असा ह्या आय टी आय चा नावलौकीक आहे.

.इलेक्ट्रिशियन वायरमन वेल्डरफिटर फिजीओथेरपी टेक्निशियन हे अभ्यासक्रम मागील पाच वर्षांपासून येथे चालवले जातात .मागील पाच वर्षात सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे . शेकडो विद्यार्थ्याना आत्मनिर्भर करण्याचे काम या आय टी आय ने केले आहे.मागील तीन वर्षं सातत्याने फिजीओथेरपी विषयात श्री गुरुजी आय टी आय चा विद्यार्थी महाराष्ट्रात गुणानुक्रमे पहिला येत आहे .या बद्दल कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांच्या हस्ते गूरुजी आय टी आय मधील विद्यार्थ्यांचा संभाजी नगर येथे सत्कार करण्यात आला आहे.
या संस्थेमध्ये अध्यापनाबरोबरच दररोज प्रार्थना व सोबत प्राणायम योगासने घेतली जातात .वर्षातुन दोन अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. मागील वर्षी परळी थर्मल व 132KV सबस्टेशन एम आय डी सी लातुर येथे तांत्रीक अभ्यास सहलीचे आयोजन केले गेले.आय टी लाआय मध्ये 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष प्रात्यक्षिके शिकवण्याचा अनुभव असलेला निर्देशक वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्याना तंत्र शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. शंभर टक्के प्रात्यक्षिके व शंभर टक्के अभ्यासक्रम येथे शिकवला जातो श्री गुरुजी आय टी आय ची गुणवत्ता पाहुन शासनाने श्रीगुरुजी आय टी आय ला प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र यावर्षीपासून मंजूर केले आहे. दोन वर्षांमध्ये आत्मनर्भर होण्यासाठी आयटीआय हा एकमेव राजमार्ग असल्यामुळे ग्रामीण भागातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा श्री गुरुजी आयटीआय ला प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
