30.1 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeजनसंपर्कदेवेंद्र भुजबळ यांना "माध्यमभूषण" पुरस्कार जाहीर

देवेंद्र भुजबळ यांना “माध्यमभूषण” पुरस्कार जाहीर

देवेंद्र भुजबळ यांना “माध्यमभूषण” पुरस्कार जाहीर

मुंबई -कोकणातील दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई,आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित, डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय व आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार ” श्री देवेंद्र भुजबळ यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. दादासाहेब धनराजजी विसपुते सभागृह ,आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे, नवीन पनवेल- ४१०२०६ येथे शनिवार दि.११ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वाजता होणार आहे.

अल्प परिचय

श्री देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी आणि गेली ५ वर्षे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे (www. newsstorytoday.com)संपादक असे मिळून गेली ४० वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.

देवेंद्र भुजबळ यांना प्रसार माध्यमातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार, मान सन्मान प्राप्त झाले आहेत. ४ महिन्यांपूर्वीच त्यांना व्यावसायिक नैपुण्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. आता पर्यंत त्यांची भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, प्रेरणेचे प्रवासी, अभिमानाची लेणी ( ई पुस्तक ) करिअरच्या नव्या दिशा,( दुसरी आवृत्ती प्रकाशित) समाजभूषण, आम्ही अधिकारी झालो,( दुसरी आवृत्ती प्रकाशित) माध्यमभूषण ही पुस्तके प्रकाशित झाली असून संवाद भूषण हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]