शहर जिल्हा भाजपाची भटक्या विमुक्त बांधवासोबत दिवाळी
वंचीताच्या विकासासाठी सदैव बांधील-अजित पाटील कव्हेकर
लातूर/प्रतिनिधी ः- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक दिवा वंचीतासाठी हा उपक्रम संपुर्ण राज्यभरात राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहर जिल्हा भाजपाने लातूर-बार्शी रोडवर असलेल्या पाड्यावर जाऊन भटक्या विमुक्त बांधवासोबत दिवाळी साजरी केली. यानिमित्ताने सदर बांधवाना दिवाळीच्या शुभेच्छा देताना शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी वंचीताच्या विकासासाठी भाजपा सदैव बांधील असल्याचे सांगून त्यांच्या कोणत्याही अडचणीत आम्ही पक्ष म्हणून तुमच्या पाठिशी राहू अशी ग्वाही अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.

अंत्योदय विकास हेच ध्येय समोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने आपली वाटचाल सुरु ठेवलेली आहे. सत्ता हे सेवेचे साधन आहे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यासह देशातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम व योजना अंमलात आणल्या जात आहेत. पक्ष म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्ष शोषित, वंचीत व पिडीताच्या मदतीसाठी तत्परतेने कायम पुढे येत असतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून प्रदेश भाजपने एक दिवा वंचीतांसाठी हा उपक्रम राज्यभर राबविला आहे. या उपक्रमांतर्गत लातूर शहर जिल्हा भाजपाने लातूर-बार्शी रोडवर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या पाड्यावर जाऊन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व इतर पदाधिकार्यांनी तेथील बांधवासोबत दिवाळी साजरी केली. भटक्या विमुक्त कुटूंबियाना दिवाळीनिमित्त भेटवस्तु, फटाके व दिवाळी फराळ भेट म्हणून देण्यात आला. तसेच अजित पाटील कव्हेकर यांच्या सह भाजप पदाधिकार्यांनी या बांधवासोबत दिवाळीचा फराळही केला.

यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी भारतीय जनता पक्ष अंत्योदय विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शोषित, वंचीत व शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम व योजनांची अंमलबजावणी करून या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. सत्ता हे सेवेचे साधन असून ही सेवा समाजातील शेवटच्या घटकांसाठी करण्यासाठी आम्ही पक्ष म्हणून बांधील असल्याची ग्वाही यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.

तसेच पाड्यावरील बांधवाना कोणतीही आणि कसलीही अडचणी आल्यास पक्ष म्हणून आम्ही सर्वजण आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी दिला. या उपक्रमात शहर जिल्हा सरचिटणीस संजय गिर, निखिल गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील, सचिन सुरवसे, राहुल भुतडा, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, अनिल पतंगे, देवा गडदे, राजकुमार गोजमगुंडे, उदय देशपांडे, विनय जाकते, राजू सोनवणे, दयानंद जाधव, गोविंद सुर्यवंशी, अस्मिता काटे, संतोष तिवारी, शैलेश आदमाने, धिरज देशपांडे, बाळासाहेब शिंदे, गणेश खाडप आदींसह पक्ष पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.





