*फिजिक्सवाला (PW) ने लातूरमध्ये पहिले तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन ‘विद्यापीठ’ सेंटर सुरू केले*
*लातूर* : Physics Wallah (PW) या शिक्षण कंपनी ने लातूर येथे आपल्या पहिल्या तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन ‘विद्यापीठ’ सेंटरचे उद्घाटन करत महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे.अंबाजोगाई रोडवरील गॅलेक्सी मॉल (दुसरा व तिसरा मजला), छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू करण्यात आलेले हे केंद्र विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे.

PW विद्यापीठ ही तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन शिक्षण केंद्रे असून, येथे विद्यार्थी अनुभवी शिक्षकांकडून प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेतात. या केंद्रांमध्ये JEE, NEET आणि फाऊंडेशन परीक्षांसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम उपलब्ध असून, ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धा परीक्षांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाते.या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड लेक्चर्स, NCERT मटेरियलसह सहाय्य, ऑफलाइन शंका निरसन सुविधा, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, विशेष मॉड्यूल्स, क्रियाकलाप-आधारित शिक्षण तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Questions) यांचा समावेश आहे. याशिवाय, PW-AITS चाचण्या, Student Success Team (SST) साठी समर्पित डेस्क आणि पालकांसाठी विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी Parent-Teacher Dashboard देखील उपलब्ध आहे.

यावेळी बोलताना PW विद्यापीठ-ऑफलाइनचे CEO अंकित गुप्ता म्हणाले,“PW मध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासू नये, हा आमचा उद्देश आहे. लातूरमध्ये हे केंद्र सुरू करून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातच उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करून देत आहोत. तसेच देशभरात अशा शैक्षणिक केंद्रांचे जाळे विस्तारण्याचा आमचा मानस आहे.”लातूरमधील या नव्या केंद्रामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण त्यांच्या शहरातच उपलब्ध होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





