*आगामी गाळप हंगामात रेणा ऊसाला १०० रुपये अधिक भाव देणार*
*शेतकऱ्यांच कल्याण करायची जबाबदारी माझी*
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची घोषणा
रेणा साखर कारखान्याची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लातूर दि. २२.राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देण्यात मांजरा परिवारातील साखर कारखाने ठरले असून आपल्या परिवारातील एकाही साखर कारखान्याने सरकारचे पॅकेज घेतलेले नाही आपण रस्ता सरळ धरला आहे अजून खूप दूर जायचे आहे लोकांचे प्रेम विश्वास आमच्यावर असून याच बळावर तुमचं कल्याण करण्यासाठी माझी जबाबदारी असल्याचे सांगून आगामी गाळप हंगामात रेणा साखर कारखाना ऊसाला गतवर्षीपेक्षा अधिक १०० रुपये भाव देण्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केली.

ते दिलीप नगर निवाडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा लातूर येथील वैष्णव हॉटेल येथे २२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथदादा शिंदे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे , आबासाहेब पाटील सेलुकर यशवंतराव पाटील सर्जेराव मोरे बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख उपाध्यक्ष प्रवीण पाटील मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई भिसे चेअरमन माणिक सोमवंशी सभापती उमाकांत खलग्रे उपसभापती शेषराव हाके कार्यकारी संचालक बी व्हि मोरे यांच्या सह सन्माननीय संचालक मंडळ मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते*इतर साखर कारखान्यांनी मारुती महाराज साखर कारखान्या एवढा भाव दयावा
**माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा विरोधकांना सवाल*

एकीकडे अनेक साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही पैसे न दिल्याने शेतकरी अर्ध नग्न उपोषणाला बसले आहेत त्याकडे मॅनेजमेंट उपोषणाकडे जाण्यास तयार नाही असा टोला लावत आमच्या मांजरा रेणा जागृति साखर कारखाना ची अधिक दरांची बरोबरी न करता किमान मारुती महाराज साखर कारखान्याने दिलेला भाव तरी तुम्ही द्या असा उपरोधक टोला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी विरोधकांना लगावला आहे सरकार धोरण बदलेन पण मी एकदा शब्द दिला की शब्दाचा पक्का असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट केले
*जिल्हा बँक कल्पवृक्ष*

राज्यात नव्हे देशात जिल्हा बँकांत पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरलेली असून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपल्या सर्वांची कल्पवृक्ष आहे या सावलीमध्ये बसा स्वप्न बघा ती पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करत जिल्ह्यात अनेक ठिकाणी आत्महत्या घडलेल्या घटना समोर आल्या याची दखल घेऊन शेतकऱयांना मुलींच्या लग्नासाठी जिल्हा बँक शुभ मंगल योजने अंतर्गत कर्ज वाटप करते आता यापुढे शून्य टक्के दराने शेतकऱ्यांना शुभ मंगल योजने अंतर्गत कर्ज देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून नवीन सभासद लोकांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे असे सांगून जिल्हा बँक चेअरमन धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक कारभार करत १० हजार कोटी रुपयांची उलाढाल करत मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे अशी माहिती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली
*विरोधकांनी पिठाची गिरणी उभी केली नाही**आबासाहेब पाटील सेलूकर यांचा विरोधकावर हल्लाबोल*

.यावेळी बोलताना राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील यांनी रेणा साखर कारखाना सुरू झाल्यापासून आजतागायत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक कारभार करत अधिक भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे असे सांगून दुसरीकडे विरोधक मात्र पारदर्शक कारभार करीत अग्रेसर असलेल्या लातूर जिल्हा बँक मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने यांच्यावर खोटे आरोप करत प्रसिध्दी मिळवत असून त्या विरोधकांनी साधी पिठाची गिरणी उभीकरता केली नाही असा टोला लावून देशमुख साहेब यांचे नाव घेतल्याशिवाय विरोधकांना अन्न पचन होत नाही जे आमच्या परिवारावर खोटे आरोप करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असा मिश्किल टोला विरोधकांना लगावला आहे
*गप्पा मारणाऱ्यांना जिल्हा बँकेत थारा देवू नका*
यावेळी माजी आमदार वैजनाथदादा शिंदे यांनी मांजरा साखर परिवारातील सर्वच साखर कारखाने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक भाव देऊन आधार देण्याचे काम करीत आहेत ज्यांनी आपल्याला २५ वर्षापासून सातत्याने खरा आधार कुटुंबांना दिला ते दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हा बँकेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व सोसायटी सभासदानी बिनविरोध निवडून द्यावे असे सांगून विरोधक अफवा गप्पा मारत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या वेळेला मदतीला धावून येणाऱ्या मांजरा साखर परिवाराचे व जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ द्या असे आवाहन केले
*११ महिन्यात रेणा साखर कारखाना उभारणी*

यावेळी बोलताना रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील यांनी लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या मदतीने अवघ्या ११ महिन्यात रेणा साखर कारखाना उभा राहिला असून कारखान्याने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक भाव वेळेवर पैसे दिल्याने या भागात आर्थिक क्रांती घडवून आली त्यामागे आदरणीय दिलीपराव देशमुख यांचा खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे रेणा साखर कारखाना राज्यात कमी वेळात उभारणी करणारा राज्यात पहिला साखर कारखाना ठरला आहे असे सांगून विरोधक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा असे सांगत शेतकऱ्यांचे आधारवड असलेले मांजरा साखर कारखाना व परिवार यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ द्यावी असे आवाहन यशवंतराव पाटील यांनी केले आहे.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक माजी चेअरमन सर्जेराव मोरे अँड त्र्यंबक भिसे, धनराज देशमुख संग्राम माटेकर चंद्रकांत सूर्यवंशी संभाजी रेड्डी तानाजी कांबळे तुकाराम कोल्हे शंकरराव पाटील सतीश पवार गोविंद पाटील रणजीत पाटील बालाजी हाके नर्सिंग इंगळे चंद्रचूड चव्हाण सौ माने उमाकांत देशमुख सचिव रविशंकर बरमदे, मिडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, सभापती श्रीकांत बैले उपसभापती महेश चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी मांजराचे संचालक वसंत उपाडे सदाशिव कदम नीलकंठ बचाटे कैलाश पाटील नवनाथ काळे सचिन शिंदे दयानंद बिडवे सुरेश चव्हाण श्रीकृष्ण काळे बालाजी जाधव यांच्यासह मारुती महाराज विलास साखर मांजरा कारखाना चे कार्यकारी संचालक, संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले तर सर्व सभासदांनी सर्व विषयांना टाळ्या वाजवून मान्यता दिली सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले.





