Homeसांस्कृतिकलातूरात रंगणार शास्त्रीय गायनाचा ‘सुरताल संगीत महोत्सव

लातूरात रंगणार शास्त्रीय गायनाचा ‘सुरताल संगीत महोत्सव

लातूरात रंगणार शास्त्रीय गायनाचा ‘सुरताल संगीत महोत्सव’पं.अंगद गायकवाड यांच्यासह अंजली व नंदिनी गायकवाड भगिनींची स्वरमैफल

लातूर : संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी व गुरुमाई शकुंतलादेवी चिगरी यांच्या पवित्र स्मरणार्थ लातूरमध्ये ‘सुरताल संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भालचंद्र ब्लड बँक सभागृहात हा भव्य सांगीतिक सोहळा रंगणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण पुणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. अंगद गायकवाड यांचे मुख्य गायन असणार आहे. आपल्या कसदार, भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पं. गायकवाड विविध राग आणि बंदिशींचे सादरीकरण करणार आहेत.

महोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अंजली गायकवाड (इंडियन आयडॉल फेम) आणि नंदिनी गायकवाड (पुणे) यांचे शास्त्रीय गायन. गायकवाड भगिनींच्या सुरेल सादरीकरणाचा आणि जुगलबंदीचा अविस्मरणीय अनुभव लातूरकर संगीतप्रेमींना घेता येणार आहे.या स्वरमैफलीला पुणे येथील नामवंत वादक विजय श्रीमंगले (हार्मोनियम) आणि चैतन्य पवार (तबला) यांची उत्कृष्ट साथसंगत लाभणार आहे.चिगरी गुरुजींच्या समृद्ध संगीत परंपरेला अभिवादन करणाऱ्या या स्वरयज्ञात शास्त्रीय संगीतप्रेमी, संगीत अभ्यासक, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय सांगीतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सुरताल संगीत महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments