Homeशैक्षणिकलातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

*नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान*

लातूर , दि. ०५ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील गणित शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आले. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

संकल्पनात्मक गणित शिक्षण आणि डिजिटल अध्यापन पद्धतीमधील त्यांच्या ३० वर्षांच्या अत्यंत भरीव व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला असून त्यांनी खेळण्यांवर आधारित अध्यापन पद्धत, कला आणि क्रीडा क्षेत्राचे शिक्षणामधील एकत्रीकरण तसेच दैनंदिन जीवनातील विविध समस्यांचे निवारण या नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या आधारे गणितासारखा क्लिष्ट विषय अत्यंत सोपा व आनंददायी बनवला आहे.

अध्यापन क्षेत्राचा तीन दशकांहून अधिक काळ अनुभव असलेल्या श्री. कुलकर्णी यांनी दमन, तुळजापूर आणि सोलापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये सेवा बजावली असून १ मे २०२६ रोजी त्यांची लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात नियुक्ती झाली आहे.गणिताचा विषय विद्यार्थ्यांना सोपा, आनंददायी आणि कृतीशील पद्धतीने शिकविण्यावर भर देणाऱ्या श्री. कुलकर्णी यांच्या ‘Maths Made Easy with Vaibhav Kulkarni’ या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर ७०० हून अधिक व्हिडिओ उपलब्ध असून याद्वारे इयत्ता नववी व दहावीच्या एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांवरील सोडवणुकी, क्षमताधारित प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी उपयुक्त साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देताना त्यांनी एनसीईआरटी स्टुडिओ, पीएम ई-विद्या, एनआयओएस आणि स्वयंप्रभा या राष्ट्रीय व्यासपीठांद्वारे विविध शैक्षणिक सत्रांचे संचालन व मार्गदर्शन केले असून सुमारे २० प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून सुमारे ९०० अधिक शिक्षकांना क्रीडा, कथाकथन व खेळण्यांच्या साहाय्याने अनुभवाधारित अध्यापन पद्धतींचे धडे दिले आहेत. कमी खर्चातील नावीन्यपूर्ण अध्यापन साहित्य तयार करण्याच्या वैशिष्ट्यातून त्यांनी पायथागोरस प्रमेयाच्या विस्तारासह समांतर रेषा व अनुरूप कोन यांसारख्या कठीण गणितीय संकल्पना सहज समजाव्यात म्हणून विविध प्रतिकृती विकसित केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments