Homeराजकीयपावसाची दडी ;संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या- मागणी

पावसाची दडी ;संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या- मागणी

४५ दिवसांपासून पावसाची दडी संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत आमदार अभिमन्यू पवार यांचे निवेदन

औसा : मागील तब्बल ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके करपून जात आहेत. पावसाअभावी गावोगावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

दि. ९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करत पावसाअभावी करपलेल्या पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.गेल्या ४५ दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके पाण्याअभावी सुकत असून अनेक भागांत शेतीची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे शेतकरी-कष्टकऱ्यांवर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

अन्नदात्याला या संकटाच्या काळात आधारित देण्याची गरज आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. त्यांनीही शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीबाबत चर्चा केली. शासनाने या संकटाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments