आनंदवाडी गौर चे प्रत्येक काम निटूर जिल्हा परिषद गटाचा सन्मान वाढवणारे – सुरेंद्र धुमाळ
आनंदवाडी गौर गावात १०० टक्के लसीकरण….
परिसरातील गावांनीही आदर्श घेण्यासारखा उपक्रम….
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर विविध हे गाव विविध उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असते. गावात कोरोना लसीकरण १००% करणारे निलंगा तालुक्यातील पहिले गाव होण्याचा मान या गावाने मिळवला व या गावामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक या सर्व महीला असुन महीलाराज चा हा एक आदर्श लातूर जिल्ह्यात निर्माण केला. व दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी गावातील नागरिकांचे १००% लसीकरण करून निलंगा तालुक्यातील इतर गावासमोर आदर्श निर्माण केला व आनंदवाडी गौर गावाचे काम निटूर जिल्हा परिषद गटाचा सन्मान वाढवणारे असल्याकारणाने निलंगा तालुका संगायो समितीचे सदस्य तथा निटूर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ सरांच्या व निटूर जिल्हा गटाच्या वतीने आनंदवाडी ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.

हे गाव पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील मसलगा उपकेंद्र अंतर्गत येत असुन या गावाने गावातील नागरिकांचे १००% कोविड लसीकरण करुन घेतले आहे. लसीकरणासाठी मसलगा उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी शिंदे, कमले मॅडम, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, गावच्या सरपंच वर्षा विष्णु चामे, उपसरपंच विमल जोतिराम नागमोडे, सदस्य सगुणा, राधिका चामे, वनीता चवरे, शालूबाई चामे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आयोध्या चामे, माजी सरपंच ज्ञानोबा चामे, विष्णु चामे, राम चवरे, हारी चवरे आदीनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या धाडसी कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी गौर गावचे लोकप्रिय युवा उपसरपंच रोहित पाटील, रमेश मोगरगे, विकास पाटील पानचिंचोलीकर, नेताजी पाटील पानचिंचोलीकर, गौर ग्रा.पं. सदस्य विठ्ठल टोकले, गौर चे चेअरमन नरसिंग ढाकणे आदीची प्रमुख उपस्थिती होती.











