25.2 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeआंतरराष्ट्रीयभारत की बात

भारत की बात

 

भारत की बात म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचे उच्चाटन

कोणत्याही देशाची प्रतिष्ठा किंवा नावलौकिक तिथल्या वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धतेत दडलेला असतो. सुदैवाने भारताला ही समृद्धता मोठ्या प्रमाणावर लाभली आहे. परंतु आधुनिक जगाचा विचार करताना ही समृद्धता काळाचे निकष लावून मोजण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा मोठी गफलत होते. खरे तर काळाचे निकष न लावता काळाच्या कसोटीवर कणखरपणे जे काही टिकून राहाते. त्यालाच समृद्धता म्हणता येते. भारतवर्षाकडे असलेले हे संचित काळाच्या प्रवाहामध्ये निमित्त म्हणून लक्षात घेता येते. आणि जगाच्या बरोबरीने जाण्यासाठी मोठे औचित्य साधता येते. ही बाब नीट समजून घेतली तर पाश्चात्य जगाचे अंधानुकरण करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. म्हणजेच काळाची फूटपट्टी लावून अंधपणे आपली मानसिकता पाश्चिमात्य करण्याचा प्रयत्न किती चुकीचा आहे हे देखील लक्षात येऊ शकेल. आपल्या या भारत देशाकडे भारतीयत्व या नावाची मोठी समृद्धता आहे. त्या प्राचीन भारतीयत्वाचे संचित निमित्त म्हणून लक्षात घेतले तर भारत की बात अशा माझ्या मनातल्या उपक्रमाचे औचित्यदेखील अधोरेखित होईल.

स्वतंत्र होऊनही वैचारिक पारतंत्र्य

आपण प्रत्येकजण स्वतःला भारताचे नागरिक म्हणवून घेतो. आपण भारतीय असल्याचा अभिमानही बाळगत असतो. परंतु आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये किंवा विचारांमध्येसुद्धा इंडिया नामक प्रवृत्ती डोकावत राहते. याचा अर्थ भारत आणि इंडिया वेगवेगळे कसे असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात येईल. परंतु या देशाचे मूळ नाव भारत आहे. आणि इंडिया हे नाव परकीयांनी किंवा आक्रमकांनी त्यांच्या सोयीसाठी स्वीकारले आणि आपल्यावर थोपवले होते. म्हणजे हे आक्रमक आपल्या सोयीसाठी देशाचे नावही बदलू शकले. तेच त्यांनी भारतीयांची मानसिकताही बदलण्याचा प्रयत्न केला. किंबहुना ती आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते. इंग्रजांच्या काळात ही वसाहतवादी मानसिकता इतकी प्रभावी झाली की जे काही पुढारलेपण असेल विकास, प्रगती असेल ही सगळी इंग्रजांमुळे किंवा पाश्चात्यांमुळे झाली, भारतीयत्व ही एक पुराणकालीन मागासलेली विचारपद्धती आहे अशा तुच्छतेने इंग्रजांनी वसाहतवादाचा प्रभाव टाकला. इंग्रज इथे आले. आपल्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या. दीडशे वर्ष राज्य केले. अनेक भारतीयांच्या बलिदानातून या भारतभूमीची मुक्तता झाली. परंतु पाश्चात्य पद्धतीच्या विचारांची वसाहत अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळते. आपल्या देशाच्या मुक्ततेला ७५ वर्षे पूर्ण होत असूनही ही मानसिकता जर कायम राहत असेल तर ती आपल्या सामर्थ्यशाली वेगवान विकासाचा अडथळा ठरू शकते. किंबहुना आपण स्वतंत्र होऊनही अजूनही मानसिक किंवा वैचारिक पारतंत्र्यातच आहोत असाच त्याचा निष्कर्ष निघतो.

भारत की बात या कल्पनेचे बीज

गेली अनेक वर्षे माझ्या मनात या गोष्टींची खंत आणि सल आहे. आपण ज्याला इंडिपेंडन्स डे किंवा स्वातंत्र्यदिन म्हणतो हे मुळातच चुकीचे ठरते. आपल्याला स्वातंत्र्य देणारे इंग्रज कोण? आपण जर ते मिळवलेले आहे. तर ती भावना देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचली पाहिजे. जोपर्यंत असे वैचारिक पारतंत्र्य नाहीसे होत नाही तोपर्यंत ही वसाहतवादी मानसिकताही जाणार नाही. आता मात्र या वसाहतवादी मानसिकतेतून समाजाला आणि देशाला बाहेर काढले पाहिजे.

संपूर्णपणे भारतीयत्वाचा अंगीकार केला जावा. आचारविचार, संस्कारातून भारतीयत्वाचे जागरण करण्यासाठीच ‘भारत की बात’ अशा एका राष्ट्रीय चळवळीला आणि विचारमंथनाला सुरुवात केली पाहिजे. या मोहीमेचा प्रारंभ अलिकडेच एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारातून झाला. भारतीयांच्या बौद्धिक गुणात्मक आणि जगभर प्रभाव असलेल्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे एक प्रदर्शन आयोजित केले गेले. भारत की बात या राष्ट्रव्यापी मोहीमेचा हे प्रदर्शन एक छोटा भाग आहे. केवळ भारत नव्हे तर जगात ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत. त्यांच्यामध्येसुद्धा या भारतीयत्वाचा स्वाभिमान जागवणे, परदेशात राहून त्यांनी जागवलेल्या भारतीयत्वाचा सर्वार्थाने आणि भारतीयांच्या मनामध्ये एक कृतीशील पुनरुत्थान घडवणे असे या ‘भारत की बात’ चळवळीचे ध्येय किंवा उद्दिष्ट आहे. हजारो वर्षानंतरही काळाच्या कसोटीवर हे भारतीयत्व टिकून राहिले आहे. अशा तत्त्वरूप बीजातून या चळवळीला प्रारंभ केला गेला आहे.

भारत की बात या चळवळीचा दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विचार केला गेला आहे. पहिला टप्पा असा की ही वसाहतवादी मानसिकता घालवणे आणि दुसरा टप्पा म्हणजे भारताच्या गौरवशाली समृद्धतेचे.

राहुल कराड ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]