डॉ मंजूषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार
आपल्या कट्ट्यावरील मंजुषा ताई कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.ही आपणा सर्वांसाठी खूप खूप आनंदाची व अभिमानाची बातमी आहे .
मंजुषा ताई च्या कवितेच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी आपणा सर्वांना लाभली हे आपले अहो भाग्य!
विषय कोणताही असो , त्यांची सकस व दर्जेदार कविता मन प्रसन्न करून जाते .( विशेषत ज्या जलदगतीने त्यांच्या कडून साहित्यनिर्मिती होते ते पाहून थक्क व्हायला होतं).
साक्षात सरस्वती देवी त्यांच्या लेखणीतून मुक्त संचारते व वाचक त्या प्रतिभेच्या वर्षावात चिंब भिजून जातो.त्या जेव्हा साहित्य निर्मिती करतात तेव्हा शब्द त्यांच्या पुढे फेर धरून नाचत असतील असे प्रकर्षाने जाणवते.केव्हा एकदा त्याच्या साहित्य पंगती मध्ये जाऊन विराजमान व्हावं असं शब्दांनाही वाटत असेल.

साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील एक अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो व ते मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मंजुषा ताई ना हा पुरस्कार त्यांच्या निर्मळ अश्या साहित्य सेवे बद्दल मिळाला असून त्यामुळे पुरस्काराचे मोल देखील वाढले आहे असे वाटते.
आपली साहित्यिक” प्रकाश वाटा” अशीच उजळत राहो व आम्हा सर्वाना ती ” दिशादर्शक” ठरो हीच गृप वरील सर्वाच्या वतीने सदिच्छा! 🙏
आपल्या पुरस्काराने आपल्या गृप वरील इतर प्रथितयश व नवोदित साहित्यिकांना निश्चितच प्रेरणा मिळेल 🙏
राजपत्रित अधिकारी , माजी भाषा संचालक , मंत्रालयात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या मराठवाड्यातील जेष्ठ लेखिका , कवयित्री डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे शिक्षण एम .ए.(संस्कृत), एचडी , पर्यंत झाले आहे. संशोधन मार्गदर्शक, संशोधन प्रकल्प , अध्यापक म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. मंजूषा कुलकर्णी यांचे विविध शंभर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत .अनेक वर्तमानपत्रातून त्यांच्या विविध लेखमाला प्रकाशित झाल्या आहेत. निवेदन , सूत्रसंचालन , व्याख्यान , काव्यलेखन, ललित लेखन , अभिवाचन , नाट्यप्रयोग , एकपात्री प्रयोग इत्यादी क्षेत्रात मागील २० वर्षापासून त्यांचे योगदान आहे .आजवर 25 हुन अधिक पुस्तके प्रकाशित असलेल्या, विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित,mpsc त महाराष्ट्रात सर्वप्रथम मानांकन मिळवलेल्या,प्रसिद्ध वक्त्या, प्रवचनकार
अशा या चतुरस्त्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ..मंजूषा कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन.



