निलंगा तालुक्यातील निटूरमोड येथे गेल्या दीड महिन्यापासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती…
डी.पी.चे बिल थकल्याने पाणीग्राहकांच्या व शेतकर्यांच्या अडचणीत भर..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा तालुक्यातील निटूरमोड हायवेच्या मार्गावरील गाव असतानाही गेल्या दीड महिन्यापासून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.याकडे संबंधित,यांचे लक्ष नसल्याने हा प्रकार घडत आहे.त्यात, डी.पी.बिलाची थकबाकी असल्याने पाणीटंचाईच्या प्रश्नांकडे सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने तत्काळ याकडे पाणीपुरवठा सुरूळीत करण्यात यावा,अशी मागणी निटूरमोड येथील नागरिक करित आहेत.
निटूरमोड चौरस्ता जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या (क्रमांक७५२) वरील निटूरमोड वस्तीवर पाणीटंचाई व डी.पी.बिल भरणा थकबाकीमुळे यासमस्येकडे महिला,नागरिक,बालगोपाळांसह ञास सहन करावा लागत आहे.याकडे, संबंधितांचे लक्ष नसल्याने गावातील समस्या वाढीत भर दिसून येत आहे त्यात निटूर व निटूरमोडवरील गटारी तुटूंब भरल्याने डासोत्त्पतीत वाढ होताना दिसत आहे.या डासोत्त्पतीमुळे आरोग्यावर मोठ्याप्रमाणे परिणाम होत आहेत.शरीरावर गलांद्या मोढ्या प्रमाणात येत आहेत.राञी विश्रांती घ्यावे म्हटले की डासांचा उच्छाद मोढ्याप्रमाणात दिसून येत आहे.या सर्व बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असताना लोकप्रतिनिधी माञ याकडे निव्वळ दूर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
एकंदर,निटूरमोडला दीड महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने त्यात डी.पी.बिलाची भरमसाठ थकबाकी असल्याने भरणा करण्यास टाळाटाळ करत असल्याने हा प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया पाणीग्राहक करित आहेत.
भर पावसाळ्यात निटूरमोड येथे गेल्या दीड महिन्यापासून महिला,नागरिक,बालगोपाळांसह पाण्यासाठी टाहो निर्माण झाल्याने याकडे संबंधित दूर्लक्ष करित असल्याने हा प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.म्हणून तात्काळ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी नागरिक करित आहेत.











